AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ दक्षिण अफ्रिकेवर पडला भारी, कर्णधार म्हणाला…

न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघात ट्राय सिरिज सुरु आहे. या स्पर्धेतील दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेवर 21 धावांनी विजय मिळवला. कसा झाला सामना आणि कर्णधार काय म्हणाला ते जाणून घ्या.

टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ दक्षिण अफ्रिकेवर पडला भारी, कर्णधार म्हणाला...
टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ दक्षिण अफ्रिकेवर पडला भारी, कर्णधार म्हणाला...Image Credit source: New Zealand Twitter
| Updated on: Jul 16, 2025 | 8:15 PM
Share

टी20 तिरंगी मालिकेत न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वे हे तीन संघ आमनेसामने आले आहेत. या स्पर्धेतील दोन सामने पार पडले असून सहाव्या सामन्यानंतर अंतिम फेरीचे संघ ठरतील. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वे आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना दक्षिण अफ्रिकेने 5 विकेट आणि 25 राखून जिंकला होता. पण दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला लोळवलं आहे. दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 173 धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 174 धावांचं आव्हान ठेवलं. पण या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा संघ 18.2 षटकात सर्व गडी गमवून 152 धावा करू शकला. यामुळे 21 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. या पराभवामुळे दक्षिण अफ्रिकेला फारसा काही फरक पडलेला नाही. कारण झिम्बाब्वेला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने नेट रनरेट चांगला असून अव्वल स्थानी आहे.

पराभवानंतर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन म्हणाला की, ‘न्यूझीलंडने आमच्यावर दबाव आणला. गोलंदाजांनी त्यांची भूमिका बजावली. आपल्याला खेळायचे आहे असा एक विशिष्ट मार्ग आहे. ही मालिका वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या खेळाडूंना वापरून पाहण्यासाठी आहे.आम्ही प्रयत्न करत राहू. सेनुरन मुथुसामी बद्दल सांगायचं तर त्याच्या गोलंदाजी करण्यासाठी हवी तशी खेळपट्टी नव्हती. पण तो आज पूर्णपणे हुशारीने गोलंदाजी करत होता.’ तर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, ‘ एक उत्तम सांघिक कामगिरी होतr. टिम आणि बेव्ह यांच्यातील भागीदारी उत्कृष्ट होती. 170 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही खूप आनंदी होतो. एकदा तुम्हाला संधी मिळाली की, तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकतात.’

न्यूझीलंडकडून टीम रॉबिनसनने 57 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटाकर मरात 75 धावांची खेळी केली. यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. रॉबिनसन म्हणाला की, ‘ मला नक्कीच खूप छान वाटतंय. विजयात योगदान देणं चांगलं वाटतंय. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना श्रेय, त्यांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली. बेव्ह आणि मी ते खोलवर कसे खेळायचे याबद्दल चर्चा करत होतो. मला वाटलं की हा एक चांगली खेळपट्टी आहे. सुरुवात करणे कठीण होते, पण एकदा तुम्ही मैदानात आलात की फलंदाजी करणे सोपे होते.’

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.