न्यूझीलंडच्या माजी धुरंदर खेळाडूची प्रकृती गंभीर, ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात भरती

या खेळाडूने 62 कसोटी, 215 एकदिवसीय आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत. 1989 मध्ये डेब्यू केल्यानंतर तो 2006 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

न्यूझीलंडच्या माजी धुरंदर खेळाडूची प्रकृती गंभीर, ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात भरती
क्रिस कॅर्न्स

सिडनी : न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस कॅर्न्स (Chris Cairns) याला रुग्णालयात भरती करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्याला लाइफ सपोर्टवर ठेवलं आहे. ख्रिस कॅर्न्स ऑस्ट्रेलियामध्ये राहत असून तिथेच कॅनबरा येथील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ‘न्यूझीलंड हेराल्ड’ च्या बातमीनुसार ख्रिसला हृदयासंदर्भातील आरोग्य समस्या असल्याने मागील काही वर्षात त्याच्यावर बऱ्याच शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या होत्या. आता मात्र त्याची प्रकृती अधिकच बिघडली आहे.

उपचारादरम्यान ख्रिसला असलेल्या आजाराला ‘ओरटिक डिसेक्सन’ असं म्हटलं जात आहे. या आजारात हृदयातील मुख्य धमणीला इजा होते. ख्रिसच्याही मुख्य धमणीला इजा झाल्याने सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

 ख्रिसची कारकीर्द

51 वर्षीय ख्रिस न्यूझीलंड क्रिकेटमधील एक आघाडीचा अष्टपैलू म्हणून ओळकला जात असे. त्याने न्यूझीलंडकडून 62 कसोटी, 215 एकदिवसीय आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत. 1989 मध्ये डेब्यू केल्यानंतर तो 2006 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.  त्यानंतर त्याने स्काई स्पोर्टवर कॉमेंट्री देखील केली होती. निवृत्तीनंतर तो पत्नी मेल आणि मुलांसह ऑस्ट्रेलियातील कॅनबरा येथेच स्थायिक झाला होता.  2000 साली न्यूझीलंडने भारताला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी क्रिसने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने आपल्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार 320 धावा करत 218 विकेट्स घेतले आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 4 हजार 950 धावांसह 201 विकेट्सच घेतले आहेत.

मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी संपवलं करीयर

भारतात पार पडलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये चंदीगड लायन्स संघाकडून खेळताना मॅच फिक्सिंगचा आरोप क्रिसवर करण्यात आला होता. त्यावेळी 11 खेळाडूंवर असे आरोप करण्यात आले होते. ज्यात ख्रिसचही चं नाव होतं. केल्याचे आरोप त्याच्यावर लावण्यात आले. मात्र त्याने हे सर्व आरोप फेटाळले. त्याने यासंदर्भात कायदेशीर लढाईही लढली. ज्यात 2015 मध्ये लंडनमधील एका न्ययालयाने त्याला फिक्सिंगच्या आरोपांतून मुक्त केलं. पण तोवर ख्रिसचं क्रिकेट करीयर मात्र संपलं होतं.

हे ही वाचा – 

T20 World Cup 2021 साठी दोन महिन्यांपूर्वीच न्यूझीलंडचा संघ जाहीर, ‘या’ दिग्गज खेळाडूला विश्रांती

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

IPL 2021 साठी नियमांमध्ये बदल, बीसीसीआयकडून नवी नियमावली जाहीर

(New zealand Cricketer chris cairns on life support in australia)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI