AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20I Tri-Series : न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेनंतर झिम्बाब्वेला 8 विकेटने नमवलं, झालं असं की…

टी20 ट्राय सिरीज मालिकेत न्यूझीलंडने झिम्बाब्वेला 8 विकेट राखून पराभूत केलं. झिम्बाब्वेने दिलेलं 121 धावांचं आव्हान 13.5 षटकात पूर्ण केलं. यासह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे.

T20I Tri-Series : न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेनंतर झिम्बाब्वेला 8 विकेटने नमवलं, झालं असं की...
न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेनंतर झिम्बाब्वेला 8 विकेटने नमवलं, झालं असं की...Image Credit source: New Zealand Twitter
| Updated on: Jul 18, 2025 | 9:10 PM
Share

झिम्बाब्वेमध्ये सुरु असलेल्या ट्राय सिरीज मालिकेतील चौथा सामना न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने 20 षटकात 7 गडी गमवून 120 धावा केल्या आणि विजयासाठी 121 धावा दिल्या. हे आव्हान न्यूझीलंडने 13.5 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. वेस्ली मधवेरे झिम्बाब्वेकडून सर्वाधिक 36 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाज काही चांगली करू शकले नाहीत. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 4 षटकात 26 धावा देत 3 गडी बाद केले. तर एडम मिलने, मिचेल सँटनर, मायकल ब्रेसवेल आणि रचिन रवींद्र याने प्रत्येकी एक गडी बाद केला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडकडून टिम सैफर्ट आणि डेवॉन कॉनवे ही जोडी मैदानात उतरली. पण टिम सैफर्ट फक्त 3 धावा करून बाद झाला. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. रचिन रवींद्र 30 धावा करून बाद झाला. त्यानंतर डेवॉन आणि डेरिल मिचेल विजयी भागीदारी केली. डेवॉन कॉनवेने 40 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 59 धावांची खेळी केली.

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा म्हणाला की, ‘आम्हाला अजिबात चांगली फलंदाजी करता आली नाही असे मला वाटतं. पॉवरप्ले ठीक होता पण एकदा फिरकी आली आणि आमची फलंदाजी डगमगली. आम्ही स्वतःला सतत त्यात अडकून देत राहिलो आणि आम्हाला बाहेर येता आले नाही. आम्हाला आमचे कौशल्य सुधारावे लागेल, दुर्दैवाने आजचा दिवस आमच्या स्वतःचे खरे प्रतिबिंब दाखवता आले नाही. जेव्हा विकेटवर सीम आणि फिरकी होती. या विकेटवर 145 धावा चांगली असती.’

न्यूझीलंडचा कर्णधार मिच सँटनर म्हणाला की, ‘आज आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आव्हान देण्यात आले. माझ्याकडून काही झेल सोडल्याचा प्रकार घडले, त्याशिवाय चांगले होतो.आम्हाला आमच्या दर्जाचा अभिमान आहे. पॉवरप्लेमध्ये ते बॅटने फटके मारणार होते असे दिसत होते आणि त्यांनी तसे केले. गोलंदाजी युनिट म्हणून आम्ही चांगली गोलंदाजी केली. मध्यभागी विकेट घेत राहिलो आणि सुदैवाने आमच्यासाठी काही फिरकी गोलंदाजी देखील होती.’

न्यूझीलंडकडून सर्वोत्तम खेळी करणाऱ्या डेवॉन कॉनवेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. डेवॉन कॉनवे म्हणाला की, मध्यभागी काही वेळ घालवणे छान होते. झेल सोडल्याने भाग्यवान ठरलो. टी20 क्रिकेटमध्ये खेळपट्टीवरचा वेळ महत्त्वाचा असतो. ब्लेसिंगने चांगली गोलंदाजी केली आणि रचिनसोबत फलंदाजी करणे आणि त्या कठीण काळातून बाहेर पडणे छान होते. ते आव्हानात्मक होते आणि त्यांना त्या विकेटवर 120 धावांपर्यंत रोखणे चांगले होते. सुदैवाने फक्त सिकंदरने फिरकी गोलंदाजी केली आणि ते आमच्यासाठी चांगले होते.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....