WTC Final: न्यूझीलंडच्या माजी प्रशिक्षकाचा भारतीय संघाला ‘गुरु मंत्र’, ‘या’ त्रिकुटाचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असल्याने आपआपली रणनीती आखण्यात दोन्ही संघ व्यस्त आहेत.

WTC Final: न्यूझीलंडच्या माजी प्रशिक्षकाचा भारतीय संघाला ‘गुरु मंत्र’, 'या' त्रिकुटाचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला
mayank jadeja aswhin

साऊदम्पटन : कसोटी क्रिकेटमधील वर्ल्ड कप मानला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (ICC World Test Championship Final) न्यूझीलंड (New Zealand) आणि भारत (India) आमने सामने भिडणार आहेत. इंग्लंडच्या साऊदम्पटन येथे 18 जून पासून सामन्याला सुरुवात होणार आहे. सध्या दोन्ही संघ मैदानावर सरावासोबत आपआपली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. यावेळी न्यूझीलंड संघाचे माजी प्रशिक्षक माइक हेसन (Mike Hesson) यांनी भारतीय संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma), शुभमन गिल (Shubhman Gill) नाही, तर मयांक अगरवालला (Mayank Agarwal) सलामीला पाठवावे असा सल्ला दिला आहे. सोबतच फिरकीपटूंचा जास्त वापर करुन रविचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांना अधिक ओव्हर द्याव्या असा सल्ला दिला आहे. (New Zealand Former coach Mike Hesson Suggest India to open with Mayank Agarwal)

सध्या भारतीय संघाकडे मुबलक प्रमाणात फलंदाज असून 6 व्या स्थानापर्यंत उत्तम असे फलंदाज आहे. मात्र सलामीला कोण येईल यावर काही प्रश्नचिन्ह असून काही सामन्यांत रोहित तर काही सामन्यांत
शुभमन ओपनिंग करतो. मात्र माइक यांनी या दोघांशिवाय मयांकला ओपनिंगसाठी उतरवण्याचा सल्ला दिला आहे.

मयांकचा किवीजविरुद्धचा रेकॉर्ड दिलासादायक!

मयांकला ओपनिंगला पाठवण्याबाबत माइक पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हणाले, “भारत रोहित आणि शुभमन यांच्याकडूनच ओपनिंग करेल असे वाटते. पण माझ्या मते मयांक अगरवालला सलामीला पाठवणे योग्य राहिल. कारण न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा त्याला अनुभव असून मागील वर्षी न्यूझीलंडच्या दौऱ्यात कसोटी सामन्यात सर्वाधिक रन्स हे मयांकने केले होते.”

फिरकीपटू करतील कमाल

माइक यांनी गोलंदाजीबाबत सांगताना फिरकीपटूंचा वापर करण्याचा सल्ला दिला. कारण हा अंतिम सामना प्रसिद्ध ड्यूक्स चेंडूनी खेळवला जाईल. हे चेंडू अधिक स्विंग होतात त्यामुळे फिरकीपटूंची भूमिका सामन्यात महत्त्वाची असेल. त्यात आश्विन आणि जाडेजा हे भारताची गोलंदाजी सांभाळण्यात महत्त्वाची कामगिरी करतात त्यामुळे त्यांच्या जास्त ओव्हर ठेवाव्या असा सल्ला माइक यांनी दिला.

भारताला जपून खेळणं गरजेच

भारत मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडशी भिडला होता. त्यावेळी न्यूझीलंडच्या दौऱ्यातील दोन्ही कसोटी सामने भारत पराभूत झाला होता. वेलिंग्टनच्या पहिल्या टेस्टमध्ये 10 विकेट्सने आणि ख्राइस्टचर्च येथील दूसऱ्या टेस्टमध्ये 7 विकेट्सने भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय संघाला चांगल्या खेळाचे प्रदर्शन करुन विजय मिळवावा लागेल.

हे ही वाचा :

या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!

WTC Final : न्यूझीलंडला हरवून 17 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा रेकॉर्ड तोडण्याची टीम इंडियाला संधी! विराट मैदान मारणार?

WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी

(New Zealand Former coach Mike Hesson Suggest India to open with Mayank Agarwal)