AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Finn Allen: आयपीएल स्पर्धेत न्यूझीलंडकडून 11 वर्षांनी शतक, कोणत्या देशाकडून सर्वाधिक सेंच्युरी? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत शतकांचा वर्षाव सुरू आहे. आतापर्यंत 11 खेळाडूंनी शतकं ठोकली आहेत. यात आता न्यूझीलंडच्या फिन एलनचा समावेश झाला आहे. न्यूझीलंडकडून 11 वर्षानंतर आयपीएलमध्ये शतक ठोकणार दुसरा फलंदाज ठरला आहे. चला जाणून घेऊयात..

Finn Allen: आयपीएल स्पर्धेत न्यूझीलंडकडून 11 वर्षांनी शतक, कोणत्या देशाकडून सर्वाधिक सेंच्युरी? जाणून घ्या
आयपीएल स्पर्धेत न्यूझीलंडकडून 11 वर्षांनी शतक, कोणत्या देशाकडून सर्वाधिक सेंच्युरी? जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 09, 2026 | 4:09 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात निराशाजनक झाली होती. सुरूवातीच्या सामन्यात वारंवार पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे कर्णधार, संघ प्रशासन आणि खेळाडू पुरते हतबल झाले होते. मात्र त्यानंतर केकेआरने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. या स्पर्धेत त्यांनी पराभवानंतर सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. तसेच आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीत असल्याचं दाखवून दिलं आहे. चौथ्या विजयात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात संघाचा ओपनर फिन एलनने आक्रमक फलंदाजी केली आणि 47 चेंडूत नाबाद 100 धावाची खेळी केली. यासह 11 वर्षानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूने आयपीएल स्पर्धेत शतक ठोकलं आहे. यापूर्वी ब्रँडन मॅकल्लमने न्यूझीलंडकडून शतकी खेळी केली होती. 2008 आणि 2015 मध्ये त्याने दोन शतकं ठोकली होती. त्यामुळे न्यूझीलंडकडून आयपीएलमध्ये शतक ठोकणारा फिन एलन हा दुसरा फलंदाज आहे.

आयपीएल इतिहासात आतापर्यंत किती शतकांची नोंद

आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून किती शतकांची नोंद झाली आहे? यात कोणत्या देशाच्या खेळाडूंनी किती शतकं ठोकली? असे प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आयपीएल 2026 हे या स्पर्धेचं 19वं पर्व आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 122 शतकं ठोकली गेली आहेत. यात पहिलं शतकं हे न्यूझीलंडच्या मॅक्कलमने केकेआरसाठी खेळताना ठोकलं होतं. न्यूझीलंडकडून तीन शतकं ठोकली गेली आणि त्यात 2 शतकं ही मॅकल्लमची आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक शतकं ठोकणारा देश हा भारत आहे. भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक शतकांची नोंद केली आहे.

आयपीएल स्पर्धेत एकूण 122 शतकं ठोकली गेली, त्यापैकी 63 शतकं भारतीय फलंदाजांनी ठोकली आहेत. म्हणजेच निम्म्याहून अधिक शतकं ही भारतीय खेळाडूंच्या नावावर आहे. यात सर्वाधिक 8 शतकं ही विराट कोहलीने ठोकली आहेत. त्यानंतर केएल राहुलने 6, संजू सॅमसनने 5 शतकं ठोकली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून या देशाच्या फलंदाजांनी 20 शतकं ठोकली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड असून 14 शतकं नावावर आहेत. यात 7 शतकं एकट्या जोस बटलरने मारली आहेत. 12 शतकांसह दक्षिण अफ्रिकेचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजच्या नावावर आठ शतकं असून ख्रिस गेलने 6 ठोकली आहेत. तर श्रीलंकेने दोन शतकं ठोकली आहेत.

Follow Us
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट