AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : अरेरे, बिचारा, LIVE मॅचमध्ये इंग्लंडचा विकेटकीपर कसा विचित्र पद्धतीने OUT झाला?

NZ vs ENG Test : क्रिकेटच्या मैदानात काहीवेळा अशा घटना घडतात, की ज्यामुळे तुम्हाला हसू आवरता येत नाही. वेलिंग्टन कसोटीत इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन बेन फोक्स विचित्र पद्धतीन आऊट झाला.

VIDEO : अरेरे, बिचारा, LIVE मॅचमध्ये इंग्लंडचा विकेटकीपर कसा विचित्र पद्धतीने OUT झाला?
ben foxesImage Credit source: VideoGrab
| Updated on: Feb 26, 2023 | 9:58 AM
Share

NZ vs ENG Test : क्रिकेट एक रोमांचक खेळ आहे. पण क्रिकेटच्या मैदानात काहीवेळा अशा घटना घडतात, की ज्यामुळे तुम्हाला हसू आवरता येत नाही. वेलिंग्टन कसोटीत इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन बेन फोक्स विचित्र पद्धतीन आऊट झाला. सोशल मीडियावर या विकेटची चर्चा आहे. फोक्स क्रीजवरच पडला पण तो स्वत:ला स्टम्पआऊट होण्यापासून वाचवू शकला नाही. वेलिंग्टनच्या पीचवर बेन फोक्स आऊट झाला. पण त्याचं बाद होणं सोशल मीडियाच्या पीचवर व्हायरल झालं.

वेलिंग्टन कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावात फोक्स बाद झाला. फोक्सने पहिल्या इनिंगमध्ये 5 चेंडूंचा सामना केला. पण तो खातं उघडू शकला नाही. तो एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला.

क्वचितच कोणी असं OUT होतं

न्यूझीलंडचा स्पिनर मायकल ब्रेसवेलने बेन फोक्सचा विकेट घेतला. ब्रेसवेलच्या चेंडूवर विकेटकीपर टॉम ब्लंडलने त्याची स्टम्पिंग केली. हा व्हिडिओपाहून फोक्स कशा पद्धतीने स्टम्पआऊट झाला, ते तुमच्या लक्षात येईल.

ब्लंडेलने क्षणाचाही विलंब नाही केला

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, ब्रेसवेलचा चेंडू खेळण्यासाठी फोक्स स्टेपआऊट झाला. तो क्रीझच्या बाहेर आला. पण त्याचवेळी फोक्सचा पाय घसरला. न्यूझीलंडचा शार्प विकेटकीपर टॉम ब्लंडेलने या चुकीचा लगेच फायदा उचलला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता फोक्सला स्टम्पआऊट केलं. फोक्स पाय घसरुन मैदानात पडला. त्याने आपला विकेट वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

बेन फोक्स पहिल्या इनिंगमध्ये खात उघडू शकला नाही.पण इंग्लंडने आपला पहिला डाव 8 विकेटवर 435 धावांवर घोषित केला. लॅथमने गाठला महत्त्वाचा टप्पा 

टॉम लॅथमने वेलिंग्टन कसोटीच्या दुसऱ्याडावात अर्धशतकी खेळी केली. या दरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमधील 5000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा 7 वा फलंदाज ठरला. 72 व्या कसोटीच्या 127 व्या इनिंगमध्ये टॉम लॅथमने हा टप्पा गाठला. वेलिंग्टन कसोटीच्या दुसऱ्याडावात झळकवलेलं अर्धशतक टेस्ट करिअरमधील 26 व अर्धशतक ठरलं.

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...