AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

England vs Sri Lanka: बेन स्टोक्स दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर, श्रीलंकेविरुद्ध कॅप्टन कोण?

England vs Sri Lanka Test Cricket: टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर श्रीलंका क्रिकेट टीम इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडला सीरिजआधीच मोठा झटका बसलाय. कॅप्टन बेन स्टोक्स दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.

England vs Sri Lanka: बेन स्टोक्स दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर, श्रीलंकेविरुद्ध कॅप्टन कोण?
ben stokes and dhruv jurelImage Credit source: bcci
| Updated on: Aug 13, 2024 | 11:58 PM
Share

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. ही मालिका वर्ल्ड् टेस्ट चॅम्पिनशीप स्पर्धेअंतर्गत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे श्रीलंका-इंग्लंड दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे उभयसंघात चांगलीच चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.मात्र त्याआधीच इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार आणि अनुभवी ऑलराउंडर बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे या कसोटी मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट टीमचं टेन्शन दुप्पट झालं आहे. आता बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत इंग्लंडचं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबत आपण जाणून घेऊयात.

बेन स्टोक्स याला द हन्ड्रेड स्पर्धेत बॅटिंग करताना त्रास जाणवला. स्टोक्सला तीव्र वेदना होत होत्या.त्यामुळे स्टोक्सला स्ट्रेचवरुन नेण्यात आलं. त्यामुळे स्टोक्सला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला मुकावं लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती.अखेर ती भीती खरी ठरली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्टोक्स दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता उपकर्णधार असलेला ओली पोप हा इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर दुसर्‍या बाजूला बेन स्टोक्स याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही.

बेन स्टोक्स आऊट, ओली पोप कॅप्टन

इंग्लंड-श्रीलंका  टेस्ट सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 21-25 ऑगस्ट, मँचेस्टर.

दुसरा सामना, 29 ऑगस्ट- 2 सप्टेंबर, लॉर्ड्स.

तिसरा सामना, 6-10 सप्टेंबर, केनिंग्टन ओव्हल.

कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम: ओली पोप (कर्णधार), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, जॉर्डन कॉक्स, हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मार्क वुड, शोएब बशीर, ओली स्टोन आणि मॅट पॉट्स.

टेस्ट सीरिजसाठी श्रीलंका क्रिकेट टीम : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पाथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चांदिमल, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो, कसुन रजिथा, लाहिरू कुमारा, निसाला थारका, प्रभात जयसूर्या, रमेश मेंडिस, जेफ्री वेंडरसे आणि मिलन रथनायके.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.