Hardik Pandya Struggle Story : संधी मिळत नव्हती, त्याच्या कामगिरीवरही बोट ठेवलं गेलं, आता भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व त्याच्या हाती

यूएईमध्ये 2021च्या आयसीसी टी-20 विश्वचषकापासून हार्दिक पांड्या भारतीय संघाबाहेर होता. पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिकला पूर्णपणे गोलंदाजी करता आली नाही.

Hardik Pandya Struggle Story : संधी मिळत नव्हती, त्याच्या कामगिरीवरही बोट ठेवलं गेलं, आता भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व त्याच्या हाती
Hardik PandyaImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 10:53 AM

मुंबई : कोणतंही यश (Success) गाठायचं असेल तर मेहनत आणि कामात सातत्य असायला हवं. कुणालाही पहिल्याच प्रयत्नात यश येत नाही. त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतात. संधी मिळण्यासाठी झगडावं लागतं. त्यासाठी आपली कामगिरी देखील उंचवावी लागते. मात्र, तुम्ही प्रामाणिकपणे काम करत आसाल तर तुम्हाला यश मिळणारच. याचाच प्रत्येय क्रिकेट विश्वातून पुन्हा एकदा आलाय. बीसीसीआयनं (BCCI)  बुधवारी रात्री जेव्हा आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यावेळी सर्वांच्या नजरा फक्त एकाच गोष्टीकडं लागल्या होत्या की संघाचा कर्णधार कोण होणार? त्यानंतर बीसीसीआयनं आयर्लंडविरुद्ध संघ घोषित करून संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडं सोपवलं. गुजरात टायटन्सनं आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या संघात विजेतेपद पटकावलंय. त्यामुळे हार्दिकला कर्णधार बनवल्याचं कुणाला आश्चर्य वाटलं नाही.  मात्र, सोशल मीडियावर हार्दिकच्या करिअरविषयी मोठ्या प्रमाणात बोललं गेलं आणि त्याच्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. आज आम्ही तुम्हाला हार्दिकच्या करिअरविषयीच सांगणार आहोत.

हार्दिकच्या करिअरविषयी जाणून घ्या…

  1. यूएईमध्ये 2021च्या आयसीसी टी-20 विश्वचषकापासून हार्दिक पांड्या भारतीय संघाबाहेर होता. पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिकला पूर्णपणे गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळे तो संघात स्थान मिळवू शकला नाही.
  2. जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करू शकत नसेल तर त्याला फलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान मिळणार नाही, असं क्रिकेट तज्ज्ञांनी त्यावेळी म्हटलं होतं.
  3. 2021 च्या T20 विश्वचषकानंतर जेव्हा हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. तेव्हा त्यानं 5 महिन्यांचा ब्रेक घेतला.
  4. त्यावेळी हार्दिकनं त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं होतं. हार्दिक पांड्यानेही त्यावेळी निवडकर्त्यांना सांगितलं की तो जोपर्यंत फिट होत नाहीय तोपर्यंत त्याची निवड केली जाणार नाही.
  5. हे सुद्धा वाचा
  6. यानंतर पांड्यानं स्वत:वर लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केली. कठोर परिश्रम आणि सातत्यानं हा पांड्या आयपीएल 2022च्या माध्यमातून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला.
  7. IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सनं हार्दिक पांड्याला त्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केलं.
  8. कर्णधार झाल्यानंतर हार्दिकच्या समोर अनेक प्रश्न होते. वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करून त्यानं टीम इंडियात पुनरागमन करावं किंवा कर्णधार म्हणून संघाची धुरा सांभाळावी.
  9. हार्दिकनं मोसमाच्या सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी केली आणि शीर्ष क्रमानं फलंदाजी केली
  10. कर्णधार म्हणूनही त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. संघाचे आघाडीवर नेतृत्व करणाऱ्या या खेळाडूने पदार्पणातच गुजरातला चॅम्पियन बनवलं.
  11. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली
Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....