भारत पाकिस्तान सामन्यात जादूटोणा! पराभवानंतर पाक मीडियाचं डोकं फिरलं, चर्चा ऐकाल तर हसाल Video

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारताकडून पराभव होताच पाकिस्तानचं रडगाणं सुरु झालं आहे. पराभवाची काहीही कारणं आता समोर ठेवली जात आहे. आधुनिक युगात पाकिस्तानी मीडियात होणारी चर्चा पाहून पोट धरून हसण्याशिवाय पर्याय उरणार नाही. या चर्चेत टीम इंडियाने काळ्या जादूने सामना जिंकल्याचा आरोप केला गेला आहे.

भारत पाकिस्तान सामन्यात जादूटोणा! पराभवानंतर पाक मीडियाचं डोकं फिरलं, चर्चा ऐकाल तर हसाल Video
| Updated on: Feb 25, 2025 | 3:48 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीत पाकिस्तानला पराभूत करून भारताने एका बाणात दोन शिकार केले आहेत. एक तर पाकिस्तानचा मागच्या पराभवाचा वचपा काढला, दुसरं भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. दुंबईत पार पडलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकूनही कर्णधार मोहम्मद रिझवानने आकडेवारीचा अभ्यास न करताच प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने सर्व गडी गमवून 241 धावा केल्या आणि विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 42.3 षटकात फक्त 4 गडी गमवून पूर्ण केलं. भारताच्या विजयामुळे पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. या पराभवानंतर पाकिस्तान क्रीडाप्रेमींना मानसिक धक्का बसला आहे. इतकंच काय तर पाकिस्तान मीडियातही काहीही विचित्र चर्चा होऊ लागल्या आहेत. पाकिस्तान पराभूत होण्याची हास्यास्पद कारण एका चर्चेत देण्यात आली. ही चर्चा ऐकून तुम्हाला हसण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

मीडियात रंगलेल्या चर्चेत एका पॅनेलने सांगितलं की, भारताने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये काळी जादू करण्यासाठी 22 पुजारी पाठवले होते. यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचं लक्ष विचलीत झालं आणि त्याचा फटका बसला. इतकंच काळ्या जादूसाठीच भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. कारण त्यांना जादूटोणा करायचा होता. पण हे पाकिस्तानात खेळले असते तर करता आलं नसतं. इतकंच काय तर दुबईतील सामन्यापूर्वी सात पुजऱ्यांनी मैदानावर धार्मिक विधी केल्याचा आरोपही या चर्चेत करण्यात आला. आता ही हास्यास्पद चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतही असे हास्यास्पद आरोप करण्यात आले होते आयसीसी टीम इंडियाला विशेष चेंडू पुरवत असल्याचं सांगितलं गेलं. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन राजा याने एका लाईव्ह चर्चेत हा आरोप केला होता. यामुळे भारतीय गोलंदाजांना यश मिळालं होतं.आता पाकिस्तानी मीडियाने काळ्या जादूचा आरोप करत पराभव झाल्याचं कारण पुढे केलं आहे. एक तर पराभव पचवता येत नाही आणि हास्यास्पद कारणं देऊन अजून हसं केलं जात आहे.