PAK vs AFG : शारजाहमध्ये पाकिस्तानची लाज गेली, अफगाणिस्तानने रचला इतिहास

PAK vs AFG T20 : पहिल्या टी 20 सामन्यात सहा विकेटने विजय मिळवला होता. दुसऱ्या टी 20 सामन्यात पाकिस्तानला 7 विकेटने धूळ चारली. अफगाणिस्तानची टीम पाकिस्तान विरुद्ध नेहमी त्वेषाने खेळते हे पुन्हा एकदा दिसून आलं.

PAK vs AFG : शारजाहमध्ये पाकिस्तानची लाज गेली, अफगाणिस्तानने रचला इतिहास
pak vs afg
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 9:18 AM

PAK vs AFG T20 : पाकिस्तान क्रिकेट टीमला रविवारी लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. शारजाहमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात पराभव झाला. या पराभवासह पाकिस्तानने सीरीजही गमावली. बाबर आजम, मोहम्मद रिजवान आणि शाहीन आफ्रिदीशिवाय पाकिस्तानची टीम खेळत होती. अफगाणिस्तानचे गोलंदाज त्यांच्यासाठी एक कोडं बनले. पहिली टी 20 त्यानंतर दुसऱ्या टी 20 मध्येही पाकिस्तानी फलंदाजांना अफगाणिस्तानच्या गोलंदाजीच उत्तर सापडलं नाही.

तीन टी 20 सामन्यांच्या सीरीजमध्ये अफगाणिस्तानने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानच्या टीमने टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये फक्त 130 धावा केल्या.

शारजाहमध्ये टीमचा ऐतिहासिक विजय

अफगाणिस्तानसाठी सुद्धा या आव्हानाचा पाठलाग करणं आव्हान बनलं होतं. पण मोहम्मद नबी पुन्हा एकदा संकटमोचक बनला. त्याने एक चेंडू बाकी राखून शारजाहमध्ये टीमला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानचा पाकिस्तान विरुद्ध हा पहिला मालिका विजय आहे.

पाकिस्तानची फ्लॉप बॅटिंग

पाकिस्तानने पहिल्या टी 20 मध्ये सुद्धा खराब फलंदाजी केली होती. रविवारी फजलहक फारुकीने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरला हादरे दिले. पहिल्याच ओव्हरमध्ये साइम अयूब आणि शफीक यांना एकापाठोपाठ एक आऊट केलं. त्यावेळी पाकिस्तानच खातही उघडलं नव्हतं. मोहम्मद हॅरिससही 15 रन्स करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाद वसीम आणि शादाब खानने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. इमादच्या 64 धावांच्या बळावर पाकिस्तानची टीम कशीबशी 130 धावांपर्यंत पोहोचली. पाकिस्तानचे शेवटपर्यंत प्रयत्न

अफगाणिस्तान टीमसाठी धावांचा पाठलाग करण अजिबात सोपं नव्हतं. पाकिस्तानी गोलंदाजांनी शेवटपर्यंत आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. गुरबाजने चांगली सुरुवात केली. नसीम शाहला पहिल्याच ओव्हरमध्ये सिक्स मारला. त्यानंतर मात्र अफगाणिस्तानची लय बिघडली. मॅचमध्ये फक्त सिंगल रन्स येत होते. खेळाडूंना बाऊंड्रीची संधी मिळत नव्हती. अफगाणिस्तानची टीम खूपच दबावात होती. पण मोहम्मद नबी आणि जादरानच्या भागीदारीने टीमचा विजय सुनिश्चित केला.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.