PAK vs BAN: सऊद शकील याचा मोठा कारनामा, बांग्लादेश विरुद्ध धमाका
Pakistan vs Bangladesh 1st Test: पाकिस्तानला पहिल्याच दिवशी बांगलादेशने झटपट झटके देत बॅकफुटवर ढकललं. मात्र सउद शकील याने अर्धशतकासह मोठा विक्रम केला.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचमधील पहिल्या दिवसाचा खेळ पूर्ण झाला आहे. पाकिस्तानने पहिल्या दिवशी 4 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी फक्त 41 ओव्हरचाच खेळ होऊ शकला. बांगलादेशने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानच्या चाहत्यांना चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती, मात्र सर्व उलटंच झालं. पाकिस्तानने अवघ्या 16 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. बाबर आझम याला भोपळाही फोडता आला नाही. तर कॅप्टन शान मसूदही अपयशी ठरला. मात्र त्यानंतर सईम अयूब आणि सऊद शकील या दोघांनी पाकिस्तानचा डाव सावरला. पाकिस्तानला या दोघांनी 100 पार पोहचवलं. सईमने या दरम्यान कसोटी कारकीर्दीतील अर्धशतक झळकावलं. तर सऊद शकील याने मोठा विक्रम केला.
सऊद शकील याने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 57 धावांची खेळी केली. सऊदने या दरम्यान मोठा कारनामा केला. सऊद कसोटी क्रिकेटमध्ये संयुक्तरित्या वेगवान 1 हजार धावा पहिला फलंदाज ठरला. सऊदने 20 डावांमध्ये ही कामगिरी केली. सऊदने 65 वर्षांआधीच्या विक्रमाची बरोबरी केली. पाकिस्तानसाठी सईद अहमद याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात 4 डिसेंबर 1959 रोजी ही कामगिरी केली होती.
दरम्यान सऊद शकील याने डिसेंबर 2022 मध्ये इंग्लंड विरुद्ध रावळपिंडी येथे पदार्पण केलं होतं. सऊदने तेव्हापासून ते आतापर्यंत पाकिस्तानसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सऊदने गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध द्विशतक केलं होतं. सऊदने 208 धावांची खेळी केली होती. सऊदने आतापर्यंत त्याच्या कसोटी कारकीर्दीत 2 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावली आहेत.
सऊद शकीलचा मोठा धमाका
1️⃣0️⃣0️⃣0️⃣ Test runs completed ✅@saudshak is the joint-fastest Pakistan batter to this landmark 👏#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/mlszoRn2Le
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 21, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.
