PAK vs BAN: दुसरा दिवस पाकिस्तानच्या नावावर, बांगलादेश 421 धावांनी पिछाडीवर
PAK vs BAN 1st Test Day 2 Stumps: पहिल्या कसोटीतील दुसरा दिवस हा पाकिस्तानच्या नावावर राहिला आहे. यजमानांनाकडे दुसऱ्या दिवसअखेर 421 धावांनी भक्कम आघाडी आहे.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. पाकिस्तानच्या नावावर दुसरा दिवस राहिला. पाकिस्ताने पहिला डाव हा 448 धावांवर घोषित केला. त्यानंतर बांगलादेशने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 12 ओव्हरमध्ये बिनबाद 27 धावा केल्या. झाकीर हुसेन आणि शादमन इस्लाम ही जोडी नाबाद परतली. झाकीरने 42 बॉलमध्ये नॉट आऊट 11 रन्स केल्या. तर शादमनने 30 चेंडूत 12 धावांचं योगदान दिलं. बांगलादेश अद्याप 421 धावांनी पिछाडीवर आहे. आता तिसऱ्या दिवशी बांगलादेश चिवट प्रतिकार करणार की पाकिस्तान झटपट गुंडाळण्यात यश मिळवणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तानची बॅटिंग
पाकिस्तानने पहिला डाव 74 षटकांमध्ये 6 बाद 448 धावांवर घोषित केला. पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी एकूण 290 धावा केल्या. त्याआधी पाकिस्तानने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तोवर 4 विकेट्स गमावून 158 धावा केल्या होत्या. सऊद शकील आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा केल्या. मोहम्मद रिझवान याने 239 बॉलमध्ये 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नॉट आऊट 171 रन्स केल्या. तर सऊद शकील याने 261 बॉलमध्ये 9 फोरसह 141 रन्स केल्या.
सॅम अय्युबने 98 बॉलमध्ये 56 रन्सची अर्धशतकी खेळी. शाहीन अफ्रिदी याने नाबाद 29 धावा केल्या. आघा सलमानने 19 रन्स केल्या. कॅप्टन शान मसूद याने 6 धावांचं योगदान दिलं. ओपनर शफीक 2 धावा करुन माघारी परतला. तर माजी कर्णधार बाबर आझम याला भोपळाही फोडता आला नाही. बांगलादेशकडून शोरिफूल इस्लाम आणि हसन महमूद या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मेहदी हसन मिराज आणि शाकिब अल हसन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
‘दुसऱ्या दिवसाचा गेम ओव्हर’
Bangladesh 🆚 Pakistan | 1st Test | Day 02 Stumps| Bangladesh trail by 421 runs. PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/QDfrcBsSoO
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 22, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.
