AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup होताच पाकिस्तानच्या 27 वर्षीय गोलंदाजाची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, 3 षटकात 5 विकेट्स घेत उडवली धमाल

टी20 विश्वचषकात अप्रतिम कामिगिरी नंतरही सेमीफायनलमध्ये पाकिस्तान संघाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता पाकिस्तानचा संघ बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी आव्हानासाठी सज्ज झाला आहे.

T20 World Cup होताच पाकिस्तानच्या 27 वर्षीय गोलंदाजाची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, 3 षटकात 5 विकेट्स घेत उडवली धमाल
पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 10:32 PM
Share

कराची: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) चांगल्या प्रदर्शनानंतरही पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने चॅम्पियन होण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. दरम्यान आता पाकिस्तानचा संघ बांग्लादेशविरुद्धच्या (Pakistan vs Bangladesh) कसोटी सामन्यांसाठी सज्ज झाला असून नुकताच संघ देखील जाहीर करण्यात आला. संघ जाहीर झाल्यानंतर लगेचच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उस्मान शिनवारी (Usman Shinwari) याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णयघेतला आहे. आता तो वनडे आणि टी20 कारकिर्दीवर लक्ष देणार असल्याचंही त्याने सांगितलं.

27 वर्षीय उस्मानने पाकिस्तानसाठी एक कसोटी सामना खेळला असून 16 नोव्हेंबर, 2021 रोजी त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. ट्विट करत त्याने याबाबतची माहिती दिली. तसंच निवृत्तीमागील कारणंही स्पष्ट केलं आहे. उस्मानने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की,“मी पाठीच्या दुखापतीतून सावरलो आहे. आता मी एकदम फिटअसून खेळण्यासाठी पात्र आहे. पण माझ्या डॉक्टरांसह फिजियोने मला कसोटी क्रिकेटपासून लांब राहण्याचा सल्ला दिल्याने मी मर्यादीत षटकांच्या क्रिकेट प्रकारात अधिक प्रगतीसाठी हा निर्णय घेत आहे.”

बांग्लादेश टेस्ट मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ: बाबर आजम (कप्तान), मोहम्मद रिजवान (उप-कर्णधार), अब्दुल्ला शफीक, आबिद अली, अजहर अली, बिलाल आसिफ, फहीम अशरफ, फवाद आलम, हसन अली, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, मोहम्मद अब्बास, मोहम्मद नवाज, नसीम शाह, नौमान अली, साजिद खान, सरफराज अहमद, सऊद शकील, शाहीन शाह अफरीदी, जाहिद महमूद.

असं आहे वेळापत्रक

पहिला सामना, 26 ते 30 नोव्हेंबर,  चटगांव.

दुसरा सामना, 4 डिसेंबर ते 8 डिसेंबर, ढाका.

इतर बातम्या

T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली

Video: विश्वचषक जिंकताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच अजब सेलिब्रेशन, बुटातून घेतला ड्रिंक्सचा आस्वाद, नेमकं कारण काय?

भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडताच रवी शास्त्रींकडे नवी कामगिरी, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

(Pakistan cricket team fast bowler usman shinwari retires from test cricket)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.