AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, भारताच्या जखमांवर मीठ

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानने सर्वात उशिराने संघ जाहीर केला आहे. स्पर्धेतील इतर संघांनी यापूर्वीच संघ जाहीर करून मोकळे झाले आहेत. पण पाकिस्तानने संघ जाहीर करण्यास टाळाटाळ केली होती. असं असताना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा करताना बाबर आझमकडे मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, भारताच्या जखमांवर मीठ
| Updated on: Jan 31, 2025 | 8:01 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर पाकिस्तान आणि दुबईत होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जानेवारी संपता संपता आपला संघ जाहीर केला आहे. खरं तर संघ जाहीर करण्यासाठी 12 जानेवारी ही शेवटची तारीख होती. पण टीम इंडिया आणि पाकिस्तानने अतिरिक्त वेळ मागून घेतला होता. भारताने 18 जानेवारीला संघ जाहीर केला. तर पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यासाठी 31 जानेवारी ही तारीख उजाडावी लागली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची जबाबदारी मोहम्मद रिझवानच्या खांद्यावर दिली आहे. तर सलमान अली आगा याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आयसीसी नियमानुसार, संघात आता 11 फेब्रुवारीपर्यंत बदल केला जाऊ शकतो. पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ट्राय सिरीज खेळणार आहे. ही मालिका 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्यानंतर 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.

चॅम्पियन ट्रॉफीसाठी घोषित केलेल्या संघात 2017 साली भारताला जखम दिलेल्या फखर जमानची एन्ट्री झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताला पराभूत करण्यात फखर जमान महत्त्वाची भूमिका बजावली होती. लंडनच्या ओव्हल मैदनात 106 चेंडूत 114 धावा केल्या. हा सामना पाकिस्ताने 180 धावांनी जिंकला होता. फखर जमानसह संघात फहीम अश्रफ, खुशदिल शाह आणि सउद शकील यांना संघात स्थान मिळालं आहे. पाकिस्तानचा पहिला सामना 19 फेब्रुवारीला न्यूझीलंडशी, दुसरा 23 फेब्रुवारीला भारताशी आणि शेवटचा सामना 27 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी साखळी फेरीत तीन पैकी 2 सामन्यात विजय मिळवणं महत्त्वाचं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा संघ : मोहम्मद रिजवान (कर्णधार/विकेटकीपर), सलमान अली आगा (उप-कर्मधार), बाबर आजम, फखर जमान, कामरान गुलाम, सऊद शकील, खुशदिल शाह, फहीम अशरफ, तैय्यब ताहिर, अबरार अहमद, शाहीन शाह अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.