बाबर आजमसह 8 खेळाडू, दुबईत पाक खेळाडूंचा डंका, 58 T20 सामन्यांत एकही पराभव नाही, भारतासाठी धोक्याची घंटा!

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी भारतासह सर्वच देशांनी आप आपले संघ जाहीर केले आहेत. दरम्यान भारताचा पहिला सामना हा 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे.

बाबर आजमसह 8 खेळाडू, दुबईत पाक खेळाडूंचा डंका, 58 T20 सामन्यांत एकही पराभव नाही, भारतासाठी धोक्याची घंटा!
पाकिस्तान क्रिकेट टीम (प्रातिनिधीक फोटो)
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 5:15 PM

मुंबई :  आगामी टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारतातील क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. 17 ऑक्टोबरपासून सुरु होणारा हा विश्वचषक भारतासाठी मात्र 24 ऑक्टोबर रोजी खऱ्या अर्थाने सुरु होईल. याच दिवशी भारत आपला स्पर्धेतील पहिला सामना खेळणार असून तो सामनाही कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तान संघाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याची उत्सुकता देशभरात खूप आहे जवळपास 2 वर्षानी भारत पाकिस्तानशी भिडणार आहे.

आतापर्यंत टी20 विश्वचषकात भारताला पाकविरुद्धचा रेकॉर्डही उत्तम आहे. पण यंदाचा पाकिस्तानचा संघ हा अत्यंत तगडा असल्याने भारताला सावध आणि चांगला खेळ करणं विजयासाठी अनिवार्य आहे. कारण संघातील 8 खेळाडूंनी मागील 58 सामने पराभवाचा तोंडच पाहिलेलं नाही. यात कर्णधार बाबरतर मागील 11 टी20 सामने सलग जिंकत आल्याने भारतासमोर एक मोठा धोका आहे.

पाकिस्तानचे स्टार उत्तम फॉर्ममध्ये

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याने यूएईमध्ये आतापर्यंत 11 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून एकही पराभूत झालेला नाही. त्यासोबतच इमाद वसीमने 11, हसन अलीने 9, उपकर्णधार शादाब खानने 8 आणि आसिफ अलीसह फखर जमानने प्रत्येकी 6-6 सामन्यात पराभवाचा तोंड पाहिलेल नाही. तर शाहिन आफ्रिदीने 4 तर मोहम्मद नवाबने 3 टी20 सामने  युएईत जिंकले आहेत. या खेळाडूंनी विश्वचषक होणाऱ्या युएईमधील मैदानात पराभव पाहिलेलाच नसल्याने भारतासाठी त्यांना पराभूत करण एक मोठं आव्हान असणार हे नक्की!

पाकिस्तानकडून संघात 3 बदल

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ आपआपली रणनीती तयार करत असून काही संघानी आपल्या अंतिम खेळाडूंची घोषणाही केली आहे. सर्वात आधी 15 सदस्यीय संघाची घोषणा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket) त्यांच्या संघात तीन बदल केले आहेत. यामध्ये एक बदल म्हणजे पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा एकमेव खेळाडू फखर जमान (Fakhar Zaman) याला राखीवमधून 15 सदस्यीय संघात जागा देण्यात आली आहे. याशिवाय संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) आणि हैदर अली (Haider Ali) यांनाही 15 सदस्यीय संघात जागा मिळाली आहे. सरफराज अहमद याला आजम खान आणि हैदर अलीला मोहम्मद हसनैन यांच्या जागेवर घेण्यात आलं आहे. तर फखर जमानला खुशदिल शाहच्या जागी खेळायची संधी मिळाली आहे. आता खुशदिल शाह राखीव खेळाडूंमध्ये असेल.

T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ :

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिल अली, सरफराज अहमद, हॅरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, फखर जमान, मोहम्मद हफीज, हैदर अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, शोएब मकसूद, शाहीन आफ्रीदी

राखीव खेळाडू : खुशदिल शाह, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन

राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणदे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

(Pakistan teams Player including captain babar and 8 others are in Good form at uae danger for Team india in T20 World Cup 2021)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.