AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eng vs Pak T20 : इंग्लंडमध्ये बाबर आझमचं वादळ, पाकिस्तानचा टी 20 मध्ये धावांचा डोंगर

Eng vs Pak T20 : पाकिस्तानने पहिल्या टी 20 सामन्यात इंग्लंडचा 31 धावांनी पराभव करुन, तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं. मात्र त्यांचा हा निर्णय संघाला महागात पडला.

Eng vs Pak T20 : इंग्लंडमध्ये बाबर आझमचं वादळ, पाकिस्तानचा टी 20 मध्ये धावांचा डोंगर
Babar Azam Pakistan
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 10:44 AM
Share

Eng vs Pak T20 नॉटिंगहॅम : इंग्लंड दौऱ्यावर (England) असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan cricket team) भलेही वन डे मालिका गमावली असली, तरी टी 20 मालिकेची (T20 ) सुरुवात झोकात केली आहे. पाकिस्तानने टी 20 मध्ये आपली सर्वोच्च धावसंख्या उभारत, इंग्लंडचा धुव्वा उडवला. पहिल्या टी ट्वेण्टी सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 विकेट गमावून तब्बल 232 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडनेही चांगली फाईट दिली. मात्र इंग्लंडला 201 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून लियाम लिविंगस्टोनने (Liam Livingstone) तुफानी शतक ठोकलं. मात्र या शतकाला विजयाचा टिळा लागू शकला नाही.

पाकिस्तानने पहिल्या टी 20 सामन्यात इंग्लंडचा 31 धावांनी पराभव करुन, तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं. मात्र त्यांचा हा निर्णय संघाला महागात पडला. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आजम (Babar Azam) आणि मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) यांनी स्फोटक सुरुवात केली. या दोघांनी 15 षटकं पूर्ण होण्यापूर्वीच 150 धावांचा टप्पा गाठला. रिझवानने 41 चेंडूवर 63 धावा, तर बाबर आझमने 3 षटकारांसह 49 चेंडूत 85 धावांची वादळी खेळी केली.

यानंतर मधल्या फळीत मकसूद 19, हाफिज 25 आणि फखर जमाने 24 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला 20 षटकात 6 बाद 232 अशी भलीमोठी धावसंख्या उभारता आली. यापूर्वी पाकिस्तानने 205 ही टी 20 मधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती.

इंग्लंडची खराब सुरुवात

दरम्यान, पाकिस्तानच्या 233 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लंडने आपल्या पहिल्या 4 विकेट 100 धावांच्या आतच गमावल्या. मात्र मधल्या फळीत लियाम लिविंगस्टोनने झंझावाती खेळी केली. त्याची खेळी पाहता इंग्लंड हा सामना जिंकेल अशी एक वेळ आली होती. 27 वर्षीय या खेळाडूने 43 चेंडूत 103 धावांची धुवाँधार खेळी केली.

लिविंगस्टोनचं शतक वाया

लियाम लिविंगस्टोनने विक्रमी शतक ठोकलं. त्याने 239.53 च्या सरासरीने 43 चेंडूत 103 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 9 षटकार आणि 6 चौकार लगावले. इंग्लंडकडून हे सर्वाधिक वेगवान शतक ठरलं आहे. शिवाय इंग्लंडकडून सर्वाधिक षटकार ठोकणार फलंदाज लियाम लिविंगस्टोन ठरला आहे.

संबंधित बातम्या 

पाकिस्तानच्या बाबर आजमचा नवा रेकॉर्ड, विराट कोहलीसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे

विराट नाही तर, ‘या’ खेळाडूंचे कव्हर ड्राईव्ह बेस्ट, पाकिस्तानच्या बाबर आजमच मत

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.