भारतीय संघाला मिळणार नवा बोलिंग कोच, राहुल द्रविडचा निकटवर्तीय घेणार जागा

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसह संपूर्ण कोचिंग स्टाफ बदलणार आहे. त्यामुळे नवा बोलिंग कोचही संघाला हवा असल्याने या जागेसाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे.

भारतीय संघाला मिळणार नवा बोलिंग कोच, राहुल द्रविडचा निकटवर्तीय घेणार जागा
पारस म्हाम्ब्रे

मुंबई: सध्या सुरु असलेल्या टी20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) अनेक बदल होणार आहेत. यात सर्वात मोठा बदल म्हणजे भारतीय संघाचे प्रशिक्षक बदलणार असून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसह (Ravi Shastri) इतर कोचिंग स्टाफही बदलणार आहे. तसंच विराट कोहली (Virat Kohli) हा देखील टी20 कर्णधारपद सोडणार आहे. दरम्यान शास्त्रींसह कोचिंग स्टाफमधील बोलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun)हे देखील पदावरुन पायउतार होणार असल्याने त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची नेमणूक करण्याचे काम सध्या सुरु आहे.

या जागेसाठी माजी क्रिकेटपटू असणारे वेगवान गोलंदाज पारस म्हाम्ब्रे (Paras Mhambrey) यांनी अर्ज केला आहे.  सोमवारी त्यांनी बीसीसीआयला (BCCI) अर्ज दिल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. म्हाम्ब्रे हे मागील 20 वर्षांपासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत जोडलेले असून राहुल द्रविड़च्या (Rahul Dravid) निकववर्तीयांपैकी एक आहेत.याबाबत बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘पारस यांनी बोलिंग कोचच्या पदासाठी अर्ज दिला आहे. अर्ज देण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर असून पार हे खूप अनुभवी कोच असून त्यांनी अंडर 19 संघासाठी काम केल्याने त्याचं सिलेक्शन होऊ शकतं.’

भारतासाठी खेळण्याचा अनुभव

म्हाम्ब्रे यांनी 1996 ते 1998 दरम्यान भारतीय संघाकडून दो टेस्ट आणि तीन वनडे सामने खेळले आहेत. तर मुंबईसाठी 91 प्रथम श्रेणी सामने खेळत 284 विकेट्स घेतले आहेत. पण त्यांना खरी ओळख कोचिंग मधूनच मिळाली आहे. रणजी ट्रॉफीत बंगाल आणि वडोदरा संघाचं कोचिंग त्यांनी केलं आहे. बंगालला त्यांनी रणजी फायनलपर्यंत पोहोचवलं होतं. त्यांनी मुंबई इंडियन्स संघासोबतही काम केलं आहे. 2020 साली फायनलपर्यंत पोहोचलेल्या अंडर 19 संघाचेही ते कोच होते.

इतर बातम्या

India vs Pakistan : पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार असणाऱ्या शाहीनचं, शाहीद आफ्रिदीशी नातं काय?

इंग्लंड संघाची ताकद वाढणार, सर्वात बलाढ्य खेळाडू संघात परतणार

India vs Pakistan T20 World Cup VIDEO | रोहित शर्माच्या खेळीवरुन पत्रकाराचा खोचक प्रश्न, विराटने आधी रोखून पाहिलं, मग मान खाली घालून हसत सुटला

(Paras mhambrey applies for team india bowling coach job)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI