AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs DC : श्रेयस अय्यरचा अर्धशतकांचा ‘पंच’, दिल्ली विरुद्ध विक्रमी खेळी, दोघांना पछाडलं

Shreyas Iyer Fifty : श्रेयस अय्यर याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये अर्धशतक झळकावलं. श्रेयसने या अर्धशतकासह दोघांना मागे टाकलं.

PBKS vs DC : श्रेयस अय्यरचा अर्धशतकांचा 'पंच', दिल्ली विरुद्ध विक्रमी खेळी, दोघांना पछाडलं
Shreyas Iyer FIifty PBKS vs DC Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 24, 2025 | 10:41 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 66 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध तडाखेदार खेळी केली. श्रेयसने जयपूरमधीर सवाई मानसिंह स्टेडियममध्ये पहिल्या डावात बॅटिंग करताना अर्धशतक झळकावलं. श्रेयसने केलेल्या या खेळीमुळे आणि अखेरच्या क्षणी मार्क्स स्टोयनिस याने दिलेल्या फिनिशिंग टचमुळे पंजाबला 200 पार मजल मारता आली. तसेच श्रेयसने या अर्धशतकासह 2 फलंदाजांना मागे टाकलं. श्रेयस यासह 18 व्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 10 व्या स्थानी येऊन पोहचला.

श्रेयसच्या अर्धशतकांचा पंच

श्रेयसने दिल्ली विरुद्ध डावातील 17 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर फोर ठोकला. श्रेयसने यासह अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयसने 33 बॉलमध्ये 160.61 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयसने या खेळीत 2 सिक्स आणि 5 फोर लगावले. श्रेयसचं हे आयपीएलच्या कारकीर्दीतील 26 वं तर 18 व्या हंगामातील पाचवं अर्धशतक ठरलं. श्रेयसने 53 धावांच्या खेळीसह लखनौ सुपर जायंट्सचा एडन मारक्रम आणि सहकारी प्रभसिमरन सिंग या दोघांना 18 व्या मोसमात सर्वाधिक धावा करण्याबाबत मागे टाकलं.

श्रेयस अय्यरची कामगिरी

श्रेयस अय्यर याने 18 व्या मोसमात आतापर्यंत 13 सामन्यांमधील 13 डावांत 172.43 च्या स्ट्राईक रेटने आणि 48.80 च्या सरासरीने 283 बॉलमध्ये एकूण 488 धावा केल्या आहेत. श्रेयसची या हंगामातील नाबाद 97 ही सर्वोच्च खेळी ठरली आहे.

दिल्लीसमोर 207 धावांचं आव्हान

पंजाबने दिल्लीला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलंय. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 206 रन्स केले. दिल्लीसाठी श्रेयस व्यतिरिक्त मार्क्स स्टोयनिस याने 16 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 44 रन्स केल्या. तर जोश इंग्लिस याने 32 तर प्रभसिमरन सिंह याने 28 धावांचं योगदान दिलं.

दिल्ली विजयी शेवट करणार?

दिल्ली कॅपिट्ल्सचा हा या मोसमातील साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दिल्लीचा हा सामना जिंकून विजयी शेवट करण्याचा प्रयत्न असणार आहे. दिल्लीला या प्रयत्नात किती यश येतं? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

पंजाब क्वालिफाय मात्र टॉप 2 साठी चुरस

दरम्यान पंजाब किंग्सने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं आहे. मात्र आता पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 संधी मिळतात. त्यामुळे प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या संघात टॉप 2 साठी चुरस आहे. ताज्या आकडेवारीनुसार, पंजाबने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत. पंजाबचा 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. तर 3 सामन्यात पंजाबचा पराभव झाला. पंजाब एकूण 17 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.