India vs Pakistan: टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होणार नाही? पडद्यामागे काय घडतंय?

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशचा पत्ता कट झाल्यानंतर आता नव्या वादाला फोडणी मिळत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ 15 फेब्रुवारीला आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लान शिजत आहे.

India vs Pakistan: टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होणार नाही? पडद्यामागे काय घडतंय?
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होणार नाही? पडद्यामागे काय घडतंय?
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 26, 2026 | 5:21 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे बांग्लादेश आणि पाकिस्तानने नाटकी सुरू केली आहेत. त्यात बांग्लादेश संघाला आडमुठी भूमिकेमुळे स्पर्धेला मुकावं लागलं आहे. असं असताना पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या कमी होताना दिसत नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा संघ भारताविरूद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला श्रीलंकेत होणार आहे. पण हा सामना न खेळण्याची रणनिती पीसीबीने आखल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तान मिडिया रिपोर्टनुसार, पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. बांगलादेशला टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून काढल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज आहे. त्यामुळे आता पीसीबीने अशी रणनिती आखली आहे.

भारत पाकिस्तान सामना रद्द झाला तर आयसीसीचं आर्थिक नुकसान होईल. भारत पाकिस्तान सामन्याला सर्वाधिक टीआरपी असतो. टी20 वर्ल्डकप फायनल, सेमीफायनल आणि इतर सामन्यांच्या तुलनेत या सामन्यातून आयसीसी आणि ब्रॉडकास्टर्सला फायदा होतो. पण हा सामना झाला नाही तर आयीसीसी आणि ब्रॉडकास्टर्सचं नुकसान होईल. पण असं पाऊल उचलण्यापूर्वी पाकिस्तानला दहा वेळा विचार करावा लागणार आहे. कारण याचे वाईट परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील. पाकिस्तानने असं काही केलं तर आयसीसी कठोर कारवाई करू शकते.

पाकिस्तानच्या माजी खेळाडूंकडू बॉयकॉटची मागणी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशचा पत्ता कापला गेला आहे. त्याऐवजी स्पर्धेत स्कॉटलँडला संधी दिली गेली आहे. असं असताना पाकिस्तानचे माजी खेळाडू विचित्र वक्तव्य करत आहे. माजी कर्णधार रासिद खानने स्पष्ट केलं की, आयसीसीच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानने टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर बहिष्कार टाकायला हवा. पाकिस्तानने टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळली नाही तर भारत आणि आयसीसीला फटका बसेल. आता पाकिस्तानी मीडियात भारत पाकिस्तान सामना रद्द होणार असल्याच्या बातम्या येत आहे. दुसरीकडे, शहबाज शरीफ आणि मोहसिन नकवीच्या बैठकीनंतर या बातमीचं खरं खोटं काय ते कळेल.