IND vs NZ : श्रेयस अय्यरला टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी मिळाली दोन सामन्यांची संधी, झालं असं की…
श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरूद्धच्या टी20 मालिकेचा भाग आहे. त्याला संघात स्थान मिळालं पण प्लेइंग 11 मध्ये काही जागा मिळाली नाही. असं असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्याला आणखी दोन सामन्यांची संधी मिळाली आहे.

न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका ही भारतीय संघ आणि क्रिकेटपटूसाठी एक चाचणी परीक्षा आहे. या चाचणी परीक्षेत भारतीय संघ पास झाला. मात्र काही खेळाडूंच्या बाबतीत अजूनही धाकधूक आहे. या मालिकेपूर्वी तिलक वर्माला दुखापत झाली आणि न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला मुकला होता. तिलक वर्माला विजय हजारे ट्रॉफीदरम्यान दुखापत झाली. त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सुरूवातीच्या तीन सामन्यात तिलक वर्मा खेळणार नाही हे स्पष्ट झालं. त्यामुळे त्याची जागा श्रेयस अय्यरने घेतली. आता तीन सामन्यांचा खेळ संपला आहे आणि चौथ्या सामन्यापासून तिलक वर्मा संघात येईल अशी चर्चा रंगली होती. पण त्याचं संघातील पुनरागमन लांबलं आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या शेवटच्या दोन टी20 सामन्यांना मुकणआर आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरला लॉटरी लागली आहे. शेवटच्या दोन सामन्यात श्रेयस अय्यर टीम इंडियासोबत असेल.
तिलक वर्माच्या दुखापतीवर टाइम्स ऑफ इंडियाने बीसीसीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सांगितलं की, त्याला आता दुखापत नाही आणि तो पूर्णपणे बरा झाला आहे. पण सेंटर ऑफ एक्सीलेन्सला टी20० विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार असावा असे वाटते. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या टी20 सामन्यात मैदानात उतरवण्याची योजना होती. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी20 सामन्यातही खेळू शकतो. पण तो मुंबईत थेट सराव सामन्यात खेळला तर बरे होईल. तिलक वर्मा दुखापतीपूर्वी स्पर्धात्मक क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याला थेट टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उतरवलं तर काही फरक पडणार नाही. निवडकर्त्यांना कोणतीही जोखिम पत्कारायची नाही. त्यामुळे टीम इंडियातील पदार्पण लांबलं आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळालं आहे. पण प्लेइंग 11 मध्ये काही जागा मिळाली नाही. पहिल्या तीन टी20 सामन्यात बेंचवर बसून राहिला. तर उर्वरित दोन सामन्यात संधी मिळणं कठीण दिसत आहे. कारण श्रेयस अय्यर काही टी20 वर्ल्डकप संघाचा भाग नाही. अशा स्थितीत त्याची चाचणी घेण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यातही श्रेयस अय्यर बघ्याच्या भूमिकेत असणार आहे.
