शाहीन शाह आफ्रिदी प्रकरणात पोलखोल झाल्यानंतरही PCB ला लाज नाही, म्हणाले….

शाहीन शाह आफ्रिदी दुखापत प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पोलखोल झाली आहे. शाहीन आफ्रिदी सध्या लंडनमध्ये आहे. तो तिथे आपल्या दुखापतीवर उपचार घेतोय.

शाहीन शाह आफ्रिदी प्रकरणात पोलखोल झाल्यानंतरही PCB ला लाज नाही, म्हणाले....
Shaheen-afridi
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 1:38 PM

मुंबई: शाहीन शाह आफ्रिदी दुखापत प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पोलखोल झाली आहे. शाहीन आफ्रिदी सध्या लंडनमध्ये आहे. तो तिथे आपल्या दुखापतीवर उपचार घेतोय. शाहीनच्या दुखापतीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड निशाण्यावर आहे. कारण शाहीनच्या दुखापतीचा खर्च उचलण्याची जबाबदारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आहे. पण शाहीन स्वत: उपचारांचा खर्च उचलतोय. माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीने हा खुलासा केला. शाहीन आफ्रिदीला स्वत:ला सर्व खर्च उचलावा लागत असल्याचा गौप्यस्फोट त्याने केला.

पीसीबीने काय म्हटलं?

शाहीद आफ्रिदीच्या या खुलाशानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चांगलीच नाचक्की झाली. त्यामुळे प्रतिमा संवर्धनासाठी आता पीसीबीने पावलं उचलली आहेत. शाहीनच्या उपचाराचा सर्व खर्च त्याला नंतर दिला जाईल, असं पीसीबीने म्हटलं आहे.

लवकरच शाहीद आफ्रिदीचा जावई होणार

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी वृत्तवाहिनी समा टीव्हीवर बोलताना हा गौप्यस्फोट केला. “स्वत:हा तिकीट काढून शाहीन यूकेला गेला आहे. तो स्वखर्चाने तिथे राहतोय. मी त्याच्यासाठी डॉक्टरची व्यवस्था केली. पीसीबीने काही केलेलं नाही” असं शाहीद आफ्रिदीने सांगितलं. शाहीन शाह लवकरच शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे.

लगेच संर्पक साधला

शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यानंतर पीसीबीने लंडनमध्ये असलेल्या शाहीनशी संपर्क साधला. शाहीनचा जितका खर्च झालाय, तो त्याला दिला जाईल, असं पीसीबीने स्टेटमेंट जारी करुन म्हटलं आहे. इएसपीएन क्रिकइन्फोने हे वृत्त दिलय. “ही काही सांगण्याची गोष्ट नाही. पीसीबी आपल्या खेळाडूंच्या रिहॅबसाठी वैद्यकीय उपचारांसाठी मदत करत राहिलं” असं त्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

फखर झमनही लंडनला जाणार

शाहीन शिवाय पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू फखर झमन गुडघेदुखापतीने त्रस्त आहे. तो सुद्धा उपचारासाठी लंडनला रवाना होणार आहे. आशिया कपमध्ये त्याला दुखापत झाली होती. “फखर लंडनमध्ये असताना पीसीबी पॅनलच लक्ष असेल. डॉक्टर इम्तियाज अहमद आणि डॉक्टर जफर इक्बाल हे उपचार करतील” असं पीसीबीने म्हटलं आहे.

पीसीबीवर जबाबदारी झटकल्याचा आरोप

शाहीनच्या दुखापतीच्या बाबतीत पीसीबीने बेजबाबदारपणा दाखवल्याचा आरोप झाला होता. शाहीनला श्रीलंकेत कसोटी सामन्याच्यावेळी दुखापत झाली होती. पण त्यानंतरही तो टीमसोबत नेदरलँडला गेला. आशिया कपमध्येही तो टीमसोबत होता. तिथेही त्याची रिहॅबची प्रोसेस सुरु होती. फार सुधारणा न झाल्याने अखेर तो लंडनला रवाना झाला.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.