5

BBL: विजयाच्या जल्लोषात क्रिकेटपटूच नाक फुटलं, तरीही आनंदात दिला इंटरव्ह्यू, पाहा VIDEO

झ्ये रिचडर्सनचा नाकातून रक्त वहात असल्याचा तो फोटो व्हायरल झाला आहे. पर्थ स्कॉर्चर्सने या सामन्यात प्रतिस्पर्धी सिडनी सिक्सर्सवर अगदी सहज विजय मिळवला.

BBL: विजयाच्या जल्लोषात क्रिकेटपटूच नाक फुटलं, तरीही आनंदात दिला इंटरव्ह्यू, पाहा VIDEO
Jhye Richardson Twitter
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 11:11 AM

मेलबर्न: मेलबर्न डॉकलँड स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सने (Perth Scorchers) सिडनी सिक्सर्सचा (Sydney Sixers) 79 धावांनी धुव्वा उडवून चौथ्यांदा बिग बॅश लीगच्या (Big Bash League) जेतेपदावर नाव कोरलं. लॉरी इव्हानच्या नाबाद 76 धावांच्या बळावर स्कॉचर्सने विजयासाठी सिडनी सिक्सर्ससमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवलं. प्रतिस्पर्धी सिडनी सिक्सर्सचा धुव्वा उडवून पर्थ स्कॉर्चर्स बिग बॅश लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरला. सामन्यानंतर पर्थ स्कॉर्चर्स संघाचा मैदानावर विजयी जल्लोष सुरु असताना झ्ये रिचर्डसनच (Jhye Richardson) नाक फुटलं. त्या रक्तबंबाळ अवस्थेतही रिचर्डसनच्या चेहऱ्यावर हास्य होतं. कारण विजयाचा आनंदच तितका मोठा होता. त्याने त्याच अवस्थेत इंटरव्ह्यू सुद्धा दिला.

हे युद्धाच्या जखमेसारखं झ्ये रिचडर्सनचा नाकातून रक्त वहात असल्याचा तो फोटो व्हायरल झाला आहे. पर्थ स्कॉर्चर्सने या सामन्यात प्रतिस्पर्धी सिडनी सिक्सर्सवर अगदी सहज विजय मिळवला. “मी अपील करण्यामध्ये बिझी होतो. तितक्यात कॉलिन मुनरो डीप स्क्वेअर लेगवरुन धावत आला. त्याचा खांदा माझ्या नाकाला लागला. हे युद्धाच्या जखमेसारखं आहे. या सगळ्याचा फायदा झाल्याचा आनंद जास्त आहे” असे रिचडर्सन फॉक्स क्रिकेटशी बोलताना म्हणाला.

शतकी भागीदारीने संपूर्ण खेळ पालटला बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात एका टप्प्यावर पर्थ स्कॉर्चर्सच्या चार बाद 25 धावा झाल्या होत्या. नॅथन लायॉनने मिचेल मार्श आणि कॉलिन मुनरोला तंबूत धाडलं होतं. पण इव्हान्स आणि टर्नरमधल्या शतकी भागीदारीने संपूर्ण खेळ पालटून टाकला. त्यांनी सिडनी सिक्सर्ससमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनीचा सिक्सर्सकडून एकही मोठी भागीदारी झाली नाही. ठराविक टप्प्याने त्यांनी विकेट गमावले. टायने तीन आणि रिचडर्सनने दोन विकेट काढल्या. ह्युजेसने सिडनी सिक्सर्सकडून सर्वाधिक 42 धावा केल्या. त्याला मार्शने रनआऊट केले. सिडनीचा संपूर्ण डाव 92 धावात संपुष्टात आला. पर्थने 79 धावांनी मोठा विजय मिळवला.

Perth Scorchers star Jhye Richardson left with bloodied nose after wild BBL title winning celebrations

Non Stop LIVE Update
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...