टीम इंडियानंतर देशांतर्गत क्रिकेट संघातून या खेळाडूचा पत्ता कट, चार डावात फक्त 89 धावा

रणजी ट्रॉफी 2024/25 स्पर्धेचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या स्पर्धेसाठी सर्वच देशांतर्गत संघांनी कंबर कसली आहे. मुंबईने संघाने 26 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. त्रिपुराविरूद्धच्या सामन्यासाठी मुंबई संघात काही बदल करण्यात आले आहेत.

टीम इंडियानंतर देशांतर्गत क्रिकेट संघातून या खेळाडूचा पत्ता कट, चार डावात फक्त 89 धावा
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 6:55 PM

बीसीसीआयच्या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यात देशांतर्गत क्रिकेटचं महत्त्व वाढलं आहे. दिग्गज खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये नशिब आजमावताना दिसत आहे. सध्या रणजी स्पर्धेचा तिसरा टप्पा सुरु आहे. मागच्या पर्वात जेतेपद मिळवलेल्या मुंबईने दुसरा सामना जिंकून स्पर्धेत कमबॅक केलं आहे. सुरुवातीच्या काही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता तिसऱ्या टप्प्यात मुंबईचा सामना त्रिपुराशी होणार आहे. हा सामना 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. हा सामना एमबीबी स्टेडियम, अगरतला येथे होणार आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने संघाची घोषणा केली आहे. या संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने रणजी ट्रॉफी 2024/25 साठीच्या तिसऱ्या सामन्यासाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघातून ओपनर पृथ्वी शॉला वगळण्यात आलं आहे. पृथ्वी शॉ या पर्वाच्या सुरुवातील काही खास करू शकला नव्हता. त्यामुळे त्याला वगळण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीच्या दोन सामन्यातील चार डावात 19.66 च्या सरासरीने फक्त 89 धावा केल्या. यात त्याचा नाबाद 39 हा सर्वोत्तम स्कोअर होता. हा स्कोअर दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात आला. पृथ्वी शॉचा फॉर्म पाहता निवड समितीने त्याला आराम देण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादव आणि तनुष कोटियन मुंबई संघाचा भाग नसतील. तनुष कोटियनला इंडिया ए संघात सहभागी केले आहे. त्यामुळे लवकरच तो इंडिया ए च्या ताफ्यात दिसणार आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवने वैयक्तिक कारणासाठी न खेळण्याचा निर्णय घेतल आहे.

सूर्यकुमार यादव आणि तनुष कोटियन यांच्या जागी संघात अखिल हेरवाडकर आणि कर्ष कोठारी यांची निवड करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. रणजी स्पर्धेतील दुसऱ्या विजयाकडे लक्ष असणार आहे.

रणजी ट्रॉफीतील तिसऱ्या सामन्यासाठी मुंबईचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, सिद्धेश बालक,सुर्यंश शेज, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), सिद्धांत अद्धतराव (विकेटकीपर), शम्स मुलानी, कर्ष कोठारी, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, जुनेद खान, रॉयस्टन डायस.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.