भारतीय संघातील वाद वाढले, पुजारा-रहाणेनंतर आणखी एका दिग्गज खेळाडूची विराटविरोधात तक्रार!

| Updated on: Sep 29, 2021 | 10:51 PM

भारताला जून महिन्यात न्यूझीलंड संघाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर मात्र संघात गोष्टी आणखी बिघडत गेल्या.

भारतीय संघातील वाद वाढले, पुजारा-रहाणेनंतर आणखी एका दिग्गज खेळाडूची विराटविरोधात तक्रार!
विराट कोहली
Follow us on

मुंबई: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा मागील काही दिवसांपासून कर्णधार पदामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच टी20 संघाचं कर्णधारपद त्याने सोडलं. खेळावर ताण येत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. पण आता मात्र संघातील काही खेळाडूंसोबत विराटचा वाद असल्याचं समोर येत आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर (WTC Final) सीनियर खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी एका गोष्टीवरुन कर्णधार विराट कोहलीविरोधात (Virat Kohli) बीसीसीआयकडे (BCCI) तक्रार केल्याची माहिती दिली होती.

त्यानंतर आता भारताचा दिग्गज फिरकीपटू आर आश्विन (R Ashwin) य़ाने देखील विराटच्या वागणूकीची बीसीसीआयकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. विशेष म्हणजे यानंतर विराटने देखील आश्विनवर राग काढत इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात आश्विनला मुद्दाम संघाबाहेर ठेवल्याचंही समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात इंग्लंडला गेला असताना सर्व काही ठिक होतं. पण WTC Final मध्ये  न्यूझीलंड विरुद्ध पराभव मिळताच सारं काही बदललं. या सामन्यात सिनीयर खेळाडूंनी निराशा केली. ज्यानंतर विराट खूप राग राग करु लागला. तो खेळाडूंना चांगली वागणूक देत नव्हता. दरम्यान या सर्वाबद्दल आश्विनने विराटची तक्रार थेट बीसीसीआयकडे केली. ज्यानंतर विराटला बीसीसीआयने जाब विचारल्याचंही समोर आलं. पण या सर्वानंतर विराट आश्विन आणखीच वाढला. विराटने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात गरज असतानाही आश्विनला संधी दिली नाही. त्याच्या या निर्णयाने सर्वच हैराण होते. त्यामुळे विराटने आश्विनला संघाबाहेर करण्याचा प्रयत्न केला. पण आता टी-20 विश्वचषकासाठी आश्विनचं नाव आलं असून विराटने वर्ल्ड कपनंतर टी20 कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचाही निर्णय़ घेतला आहे. दरम्यान या वादाचा भारताच्या विश्वचषकातील कामगिरीवर परिणाम झाले नाही तरच बरे होईल….

रहाणे पुजारानेही केली होती तक्रार

आणखी एका रिपोर्टनुसार समोर आलेल्या माहितीत WTC सामन्यात भारतीय फलंदाजानी मोठी निराशा केली. त्यामुळे साहजिकच याचं सर्वाधिक खापर वरिष्ट फलंदाज रहाणे आणि पुजारावरच फुटणार होतं,  तसंच काहीसं झालं. सूत्रांच्या माहितीनुसार या मोठ्या पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहलीने पुजारा आणि रहाणे यांची खिल्ली उडवली. पुजाराच्या स्लो स्ट्राइक रेटवर प्रश्न उपस्थित केले. तर रहाणेच्या खराब फॉर्मला विराटने टार्गेट केलं. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोघांनीही BCCI सेक्रेटरी जय यांना स्वत: फोन करत याबाबत तक्रार केली होती.

हे ही वाचा

IPL 2021: मुंबई इंडियन्स संघात बदल, अर्जुन तेंडुलकर स्पर्धेबाहेर, नव्या खेळाडूला संधी, ‘हे’ आहे कारण

टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी धोनीला मेन्टॉर का केलं?, BCCI कडून पहिल्यांदाच मोठा खुलासा, विराटला इशारा!

महिला खेळाडूंसाठी हेही आव्हान, अशी चाचणी ज्यात स्त्री असल्याचं सिद्ध करावं लागतं, जाणून घ्या काय आहे ‘जेंडर वेरिफिकेशन’?

(R Ashwin also complaints about Virat Kohli at time of WTC final so virat excluded him from england matches)