AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीफ सिलेक्टरला अनेकजण शिव्या देतात, पण.. माजी सलामीवीर खेळाडूकडून अश्विनचं कौतुक

अजित आगरकर आणि बीसीसीआय यांच्यातील कथित मतभेदांच्या चर्चेदरम्यान आर. अश्विनने मुख्य निवडकर्ते आगरकर यांना उघडपणे पाठिंबा दिला. त्याचं कौतुक आता टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं केलं आहे.

चीफ सिलेक्टरला अनेकजण शिव्या देतात, पण.. माजी सलामीवीर खेळाडूकडून अश्विनचं कौतुक
R Ashwin Ajit AgarkarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 7:50 PM
Share

अजित आगरकर आणि बीसीसीआय यांच्यातील कथित मतभेदांच्या चर्चेदरम्यान आर अश्विनने मुख्य निवडकर्ते म्हणून त्यांना उघडपणे पाठिंबा दिला. विशेष म्हणजे आगरकर यांच्या कार्यकाळातच अश्विनला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. तरीही वैयक्तिक भावना बाजूला ठेवून अश्विनने आगरकर यांच्या कामाचे कौतुक केले. अश्विनच्या या भूमिकेचे माजी सलामीवीर आकाश चोप्रानेही तोंडभरून कौतुक केले आहे.

अश्विनने दाखवले धाडस

आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विनने मनाचा मोठेपणा दाखवला हे कौतुकास्पद असल्याचे म्हटले. अनेक मोठे खेळाडू मनात कटुता ठेवतात. त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचे घडल्याची भावना 10 ते 15 वर्षांनंतरही कायम राहते. चीफ सिलेक्टरला अनेकजण शिव्या देतात. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही काही खेळाडू जुना राग मनात ठेवतात, असे चोप्राने नाव न घेता सांगितले. अशा परिस्थितीत स्वतःला संघातून वगळलेल्या निवडकर्त्याचे कौतुक करणे ही मोठी गोष्ट असल्याचे चोप्राने स्पष्ट केले. अश्विन हा स्पष्टवक्ता आणि प्रामाणिक आहे. तो मनातील गोष्ट थेट बोलतो. संघातील बदलांचा काळ हाताळणे हे निवडकर्त्यासाठी सोपे नसते, याची अश्विनला जाणीव असल्याचेही चोप्राने म्हटले.

पडद्यामागे अनेक गोष्टी

आगरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना पडद्यामागे नेमक्या कोणत्या गोष्टी घडतात याची माहिती नसते, असे चोप्राने सांगितले. आगरकर कराराने बांधलेले असल्यामुळे प्रत्येक गोष्ट सार्वजनिकपणे सांगू शकत नाहीत. त्यांनी केवळ खेळाडूंचे विक्रम किंवा वलय पाहण्याऐवजी संघाच्या भविष्यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत, असे चोप्राने नमूद केले.

दरम्यान, अश्विननेही आगरकर यांच्यावर बोलताना वरिष्ठ खेळाडूंना संघातून बाहेर करणे सोपे नसल्याचे म्हटले होते. स्वतःलाही आगरकर यांच्या कार्यकाळात वगळण्यात आल्याचे मान्य करत, वैयक्तिक भावना बाजूला ठेवल्यास आगरकर हे उत्तम निवड समिती अध्यक्ष राहिले आहेत, असे अश्विनने स्पष्ट केले होते. अश्विनच्या या भूमिकेमुळे आगरकर यांच्या निवड समितीच्या कार्यपद्धतीवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. वरिष्ठ खेळाडूंशी संबंधित निर्णय घेताना निवडकर्त्यांवर किती दबाव असतो, याकडेही या निमित्ताने लक्ष वेधले गेले. त्यामुळे अश्विनने स्वतःच्या अनुभवाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आगरकर यांच्या कामाचे केलेले कौतुक चर्चेचा विषय ठरले आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा