AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझं डोकं फिरलं…’ हार्दिक पांड्याचा निर्णय पाहून आर अश्विन वैतागला, या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावला

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सलग तिसऱ्या पराभवाची नोंद केली आहे. आरसीबीने मुंबई इंडियन्सला 18 धावांनी पराभूत केलं. पण या सामन्यात हार्दिक पांड्याने घेतलेले निर्णय पाहून आर अश्विनचं डोकं फिरलं.

'माझं डोकं फिरलं...' हार्दिक पांड्याचा निर्णय पाहून आर अश्विन वैतागला, या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावला
'माझं डोकं फिरलं...' हार्दिक पांड्याचा निर्णय पाहून आर अश्विन वैतागला, या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावलाImage Credit source: PTI
| Updated on: Apr 13, 2026 | 8:25 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील सर्वात तगडा संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिलं जात आहे. पण या संघाची स्पर्धेतील सुरूवात काही चांगली झालेली नाही. पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं. राजस्थान रॉयल्स संघाने तर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीच्या चिंध्या केल्या. तर आरसीबीनेही गोलंदाजीवर जोरदार प्रहार करत 240 धावांचा पल्ला गाठला. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 222 धावा केल्या. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू आर अश्विनने हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हार्दिक पांड्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचा पराभव निश्चित झाल्याचं त्याने सांगितलं. नेमकं हार्दिक पांड्याचं काय चुकलं? आर अश्विनने हार्दिक पांड्याच्या कोणत्या निर्णयावर बोट ठेवलं? ते जाणून घेऊयात.

आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेवर आयपीएल स्पर्धेत आरसीबी विरुद्ध हार्दिक पांड्याच्या निर्णयावर टीका करताना सांगितलं की, रजत पाटीदारचा फिरकीपटूंविरुद्ध रेकॉर्ड चांगला आहे. रजत पाटीदार जेव्हा फलंदाजीला आला, तेव्हा हार्दिकने लगेचच चेंडू मयंक मार्केंडेयकडे सोपवला. आर अश्विन म्हणाला की, ‘रजत पाटीदार फिरकी गोलंदाजांना मोठे फटके मारतो. जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा हार्दिकने चेंडू सरळ मयंक मार्केंडेयकडे दिला.’

आर अश्विनने पुढे सांगितलं की, ‘आम्हाला यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल की मयंक मर्केंडेयच्या डोक्यात काय सुरू असेल. हैदराबादमदध्ये पाटीदारने त्याला स्थिती वाईट केली होती. पाटीदार फलंदाजीला आला तेव्हा त्याच्याकडे चेंडू सोपवला. हा निर्णय खूपच वाईट होता. माझं डोकं फिरलं. 210 आणि 240 मध्ये फरक असतो. मुंबईच्या फिरकीपटूंनी 6 षटकात 80 धावा दिल्या.’

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची या पर्वात नाजूक स्थिती आहे. जसप्रीत बुमराहाला देखील विकेट मिळत नाही. शार्दुल ठाकुरने 13.45 च्या इकोनॉमीने, ट्रेंट बोल्टने 12.22 इकोनॉमीने धावा दिल्या. अल्लाह गजनफर आणि मिचेल सँटनरची गोलंदाजीही प्रभावी ठरली नाही. त्यामुळे संघाचा पूर्ण भार आता फलंदाजांवर पडला आहे. 240 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी 222 धावा केल्या. 18 धावांनी पराभव झाला, पण याच धावा गोलंदाजांनी रोखल्या असत्या तर चित्र वेगळं असतं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...