Rahul Dravid | राहुल द्रविड यांची पुन्हा हेड कोच झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Rahul Dravid Reaction | बीसीसीआयने पुन्हा एकदा राहुल द्रविड यांना मुदतवाढ देत मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली. तसेच इतर सपोर्ट स्टाफलाही मुदतवाढ मिळाली आहे. हेड कोच म्हणून कार्यकाळ वाढवून मिळाल्यानंतर राहुल द्रविड यांनी भारताला आश्वासन दिलं आहे.

Rahul Dravid | राहुल द्रविड यांची पुन्हा हेड कोच झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 4:22 PM

मुंबई | क्रिकेट टीम इंडियाचं विश्व विजेता होण्याचं स्वप्न थोडक्यासाठी अधुरं राहिलं. वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केलं. यासह हेडकोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला होता. द्रविड यांनी पुन्हा हेड कोच होण्यास पसंती दर्शवली नाही. त्यांनी ऑफर नाकारली. मात्र आता बीसीसीआयने हेड कोच राहुल द्रविड यांच्यासह संपूर्ण सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबबतची माहिती दिली आहे. यानंतर राहुल द्रविड यांनी साऱ्या भारताला आश्वासन दिलं आहे.

राहुल द्रविड यांचा हेड कोच म्हणून कार्यकाळ संपताच व्हीव्हीएस लक्ष्मण याचं नाव हे चर्चेत होतं. व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाचं प्रशिक्षकपद आहे. त्यामुळे लक्ष्मण टीम इंडियाचे हेड कोच असणार अशी चर्चा होती. मात्र बीसीसीआयने मुदतवाढ दिल्याने लक्ष्मणच्या नावाच्या चर्चांना अधिकृत पूर्णविराम मिळाला आहे.

द्रविड यांनी हेड कोच म्हणून मुदवाढ मिळताच गेल्या 2 वर्षांतील प्रवासाला उजाळा दिला. टीम इंडियासोबतची गेली 2 वर्ष अविस्मरणीय होती. तसेच या दरम्यान फार चढउतार पाहिले. आम्ही या दरम्यान एकमेकांना सहकार्य केलं. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये जे वातावरण तयार केलं, त्याबाबत मला गर्व असल्याचं द्रविड यांनी स्पष्ट केलं.

“आमच्या टीमकडे असलेली प्रतिभा आणि कौशल्य हे अभूतपूर्व आहे. सातत्य ठेवणं आणि त्याचं पालण करणं यावर आम्ही जोर दिलाय. तसेच बीसीसीसीआय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, तसेच या कालावधीदरम्यान समर्थ दिलं त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे” अशा शब्दात द्रविडने मॅनेजमेंटचे आभार मानले.

टीम इंडियाला आश्वासन

“हेड कोच असल्याने कुटुंबियांपासून दूर रहावं लागतं, ती या पदाची गरज आहे. या मागे माझ्या कुटुंबियांचा त्याग आणि पाठिंबा आहे. कुटुंबियांची पडद्यामागून मोठी भूमिका राहिली आहे. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर अनेक आव्हान आहेत, आम्ही त्यांचा स्वीकार करतो. आम्ही पुढच्या वेळेस यापेक्षा चांगलं खेळू. आम्ही त्यासाठी बांधिल आहोत”, असं आश्वासन द्रविड यांनी साऱ्या भारताला दिलं.

Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती.
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक.
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके.