ना कोहली ना रिकी पाँटिंग, या खेळाडूची कॅप्टन म्हणून निवड, द्रविडने या हिऱ्याला हेरलं!
द वॉल म्हणून ख्याती असलेल्या राहुल द्रविडने जगातील सर्वोत्तम कर्णधाराची नियुक्ती केली आहे. एका चॅलेंजमध्ये राहुल द्रविड यांना वेगवेगळ्या कर्णधारांपैकी एकाची निवड करायची होती. सुरुवातीला द्रविड यांनी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉ पेक्षा विराट कोहलीची निवड केली.

क्रिकेट जगतात सर्वोत्तम कर्णधार कोण? या वादावर नेहमीच चर्चा होत असते. क्रीडाप्रेमी आपल्या आवडीनिवडीनुसार कर्णधाराला पसंती देत असतो. त्यामुळे अनेकदा क्रीडाप्रेमींमध्येही वादही होतात. पण हे वाद फक्त आपल्या लाडक्या खेळाडूसाठी असतात. असं असताना क्रिकेटरच्या मनातही आवडता कर्णधार असतो. अनेकदा क्रिकेटपटू आपल्या आवडच्या कर्णधाराचं उघडपणे नावही घेतात. पण जेव्हा अनेक पर्याय असतात तेव्हा त्यापैकी एकाची निवड कशी करतात याची उत्सुकता असते. ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, भारताचा विराट कोहली की पाकिस्तानचा इम्रान खान? अशा अनेक दिग्गजांची नावे यादीत असतील, तर संभ्रमात पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि ‘द वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविड यांनी या सर्व दिग्गजांना मागे टाकत एका भारतीय खेळाडूची जगातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून निवड केली आहे. द्रविड यांनी निवडलेला हा नंबर 1 कॅप्टन दुसरा कोणी नसून भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे.
राहुल द्रविडने धोनीला कशी पसंती दिली?
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या एका सोशल मीडिया चॅलेंजमध्ये राहुल द्रविड यांना वेगवेगळ्या कर्णधारांपैकी एकाची निवड करायची होती. सुरुवातीला द्रविड यांच्यासमोर बेन स्टोक्स आणि स्टीव्ह स्मिथचा पर्याय ठेवला. तेव्हा त्याने स्टीव्ह स्मिथची निवड केली. त्यानंतर केन विल्यमसन, अर्जुन राणातुंगा, ग्रीम स्मिथ, स्टीफन फ्लेमिंग, मायकल क्लार्क, इयान मॉर्गन आणि पॅट कमिन्स पर्याय एक एक करून पुढे ठेवला. पण द्रविडने स्टीव्ह स्मिथलाच पसंती दिली. पण रिकी पाँटिंगचं नाव आलं आणि स्टीव्ह स्मिथला सोडलं. पॉटिंगने कर्णधार म्हणून 220 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्यासोबत 4 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत.
पॉटिंगचा पर्याय समोर असताना एलन बॉर्डरच नावं घेतलं. पण पॉटिंगला पसंती दिली. पण स्टीव्ह वॉचं नाव येताच रिकी पॉटिंगला सोडलं. पण विराट कोहलीचं नाव येताच स्टीव्ह वॉ त्याच्यासमोर टिकला नाही. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव वॉ पेक्षा विराट कोहलीची निवड केली. पण जेव्हा विराट कोहली विरुद्ध पाकिस्तानचे इमरान खान असा पर्याय आला, तेव्हा द्रविड यांनी इमरान खान यांना पसंती दिली. या चॅलेंजचा सर्वात रोमांचक टप्पा तेव्हा आला, जेव्हा इमरान खान यांच्या समोर एमएस धोनीचे नाव आले. द्रविड यांनी क्षणाचाही विलंब न करता धोनीची निवड केली.अगदी शेवटच्या फेरीत वेस्ट इंडिजचे दिग्गज क्लाइव्ह लॉयड समोर असतानाही द्रविड धोनीच्याच पाठीशी उभे राहिले.
धोनीच का ठरला सर्वोत्तम?
महेंद्रसिंह धोनीच्या कार्यकाळात टीम इंडियाने आयसीसी चषकांचा दुष्काळ संपवला. त्याच्या कारकिर्दीत भारताने आयसीसीच्या तिन्ही मुख्य ट्रॉफी (2007 टी20 वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2011 चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकल्या आहेत. धोनीच्या उत्कृष्ट रणनीतीमुळे राहुल द्रविड यांनी त्याला रिकी पाँटिंग, स्टीव्ह वॉ आणि विराट कोहली या सर्वांपेक्षा वरचे स्थान दिले.