AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल द्रविडच्या मुलाला बीसीसीआयने दिली संधी, भारताच्या या संघातून खेळणार

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या दोन्ही मुलांची चर्चा होत असते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. आता विकेटकीपर फलंदाज असलेल्या अन्वय द्रविडला बीसीसीआयकडून मोठी संधी मिळाली आहे.

राहुल द्रविडच्या मुलाला बीसीसीआयने दिली संधी, भारताच्या या संघातून खेळणार
राहुल द्रविडच्या मुलाला बीसीसीआयने दिली संधी, भारताच्या या संघातून खेळणार Image Credit source: PTI/X
| Updated on: Nov 04, 2025 | 6:35 PM
Share

‘बाप तसा मुलगा’ अशी म्हण प्रचलित आहे. भारतीय क्रिकेटविश्वात आता बाप मुलाची जोड्या पाहायला मिळत आहे. मग तो सचिन-अर्जुन असो की वीरेंद्र सेहवागचा मुलगा.. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिग्गज क्रिकेटपटूंची मुलं चांगली कामगिरी करत आहेत. भारताचा दिग्गज स्टार क्रिकेटपटू राहुल द्रविडची दोन्ही मुलं मैदानात चांगलाच घाम गाळत आहेत. द्रविडचा छोटा मुलगा अन्वय मागच्या काही दिवसात चर्चेत आहे. नुकतंच त्याला कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने वार्षिक समारंभात सन्मानित केलं होतं. त्याने मागच्या महिन्यात वीनू मांकड ट्रॉफीत कर्नाटक संघाच्या नेतृत्व बजावलं होतं. आता त्याच्या कष्टाचं आणि कामगिरीचं बक्षीस मिळालं आहे. त्याची मोठ्या स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविडला हैदराबादमध्ये सुरु होणाऱ्या मेन्स अंडर 19 वनडे चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी निवडलं आहे. ही स्पर्धा याच वर्षी होणार आहे. त्यामुळे अन्वयला स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याची संधी आहे.

अंडर 19 वनडे चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या चार संघापैकी सी संघात अन्वयची निवड झाली आहे. या संघाची जबाबदारी एरॉन जॉर्जच्या खांद्यावर आहे. तर उपकर्णधार हा आर्यन यादव आहे. अन्वय हा टॉप ऑर्डर फलंदाज आणि विकेटकीपर आहे. अन्वय आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. ही स्पर्धा 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. टीम सी संघाचा पहिला सामना टीम बी विरुद्ध शुक्रवारी होणार आहे. या सामन्यात अन्वयला काहीतरी मोठं करण्याची संधी आहे. बी संघाची धुरा वेदांत त्रिवेदीच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे, राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित द्रविड सुद्धा फलंदाज आहे. नुकतंच महाराजा टी20 केएससीए ट्रॉफीत काही सामने खेळला होता.

अंडर-19 वनडे चॅलेंजर ट्रॉफीसाठी सर्व संघाचे खेळाडू

टीम ए: विहान मल्होत्रा (कर्णधार), अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि विकेटकीपर), वंश आचार्य, बालाजी राव (विकेटकीपर), लक्ष्य रायचंदानी, विनीत वी के, मार्कंडेय पांचाल, सात्विक देसवाल, वी यशवीर, हेमचुदेशन जे, आर एस अंब्रीश, हनी प्रताप सिंह, वासु देवानी, युधाजीत गुहा, ईशान सूद.

टीम बी: वेदांत त्रिवेदी (कर्णधार), हरवंश सिंह (उपकर्णधार आणि विकेटकीपर), वाफी कच्छी, सागर विर्क, सायन पॉल, वेदांत सिंह चौहान, प्रणव पंत, एहित सलारिया (विकेटकीपर), बी के किशोर, अनमोलजीत सिंह, नमन पुष्पक, डी दीपेश, मोहम्मद मलिक, महमद यासीन सौदागर, वैभव शर्मा.

टीम सी: एरॉन जॉर्ज (कर्णधार), आर्यन यादव (उपकर्णधार), अनिकेत चटर्जी, मणिकांत शिवानंद, राहुल कुमार, यश कासवंकर, अन्वय द्रविड़ (विकेटकीपर), युवराज गोहिल (विकेटकीपर), खिलन ए पटेल, कनिष्क चौहान, आयुष शुक्ला, हेनिल पटेल, लक्ष्मण पृथी, रोहित कुमार दास, मोहित उल्वा.

टीम डी: चंद्रहास दश (कर्णधार), मौल्यराजसिंह चावड़ा (उपकर्णधार), शांतनु सिंह, अर्णव बुग्गा, अभिनव कन्नन, कुशाग्र ओझा, आर्यन सकपाल (विकेटकीपर), ए रापोले (विकेटकीपर), विकल्प तिवारी, मोहम्मद एनान, आयान अकरम, उद्धव मोहन, आशुतोष महिड़ा, एम तोषित यादव, सोलिब तारिक.

माझं लग्न होत नाही, मला पत्नी द्या... अकोल्यातील तरूणाचे पवारांना पत्र
माझं लग्न होत नाही, मला पत्नी द्या... अकोल्यातील तरूणाचे पवारांना पत्र.
शिर्डीत चमत्कार? साईबाबाचं दर्शन अन् अंध मुलाला दृष्टी! दावा नेमका काय
शिर्डीत चमत्कार? साईबाबाचं दर्शन अन् अंध मुलाला दृष्टी! दावा नेमका काय.
पार्थ अजित पवारांचे 42 कोटीही वाचवणार? दमानियांचा दावा काय?
पार्थ अजित पवारांचे 42 कोटीही वाचवणार? दमानियांचा दावा काय?.
महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच चुरशीची लढत
महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच चुरशीची लढत.
ड्रग्स तस्करीचे आरोपी भाजपवासी; विरोधकानी घेरल, सुळेंचं थेट CMला पत्र
ड्रग्स तस्करीचे आरोपी भाजपवासी; विरोधकानी घेरल, सुळेंचं थेट CMला पत्र.
लालकिल्ला 26 जानेवारीला अतिरेक्याच्या टार्गेटवर, धक्कादायक खुलासे समोर
लालकिल्ला 26 जानेवारीला अतिरेक्याच्या टार्गेटवर, धक्कादायक खुलासे समोर.
ज्यांचे पती, वडील नाही अशा 'बहिणीं'साठी मोठे बदल, तटकरेंची मोठी माहिती
ज्यांचे पती, वडील नाही अशा 'बहिणीं'साठी मोठे बदल, तटकरेंची मोठी माहिती.
अंजली दमानियांचा अजित दादांच्या 69 कंपन्यांबाबत गंभीर आरोप काय?
अंजली दमानियांचा अजित दादांच्या 69 कंपन्यांबाबत गंभीर आरोप काय?.
मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल
मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल.
सांगली हादरली, बर्थडे पार्टीत काय घडलं? नेत्याची 'मुळशी पॅटर्न'न हत्या
सांगली हादरली, बर्थडे पार्टीत काय घडलं? नेत्याची 'मुळशी पॅटर्न'न हत्या.