Ranji Trophy Final 2022: अपघात घडला, पण सर्फराज थोडक्यात मोठ्या दुखापतीमधून बचावला, पहा VIDEO

Ranji Trophy Final 2022: आज दुसऱ्यादिवशी सर्फराज खानने (134) दमदार शतक झळकावलं. त्याच्या सेंच्युरीच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात 374 धावा केल्या. या शतकी खेळ दरम्यान सर्फराज एका मोठ्या दुर्घटनेतून बालाबाल बचावला.

Ranji Trophy Final 2022: अपघात घडला, पण सर्फराज थोडक्यात मोठ्या दुखापतीमधून बचावला, पहा VIDEO
sarfarz khanImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 2:23 PM

मुंबई: मुंबई आणि मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya Pradesh) मध्ये रणजी करंडक 2022 (Ranji Trophy Final 2022) ची फायनल सुरु आहे. बंगळुरुमध्ये हा सामना सुरु आहे. आज दुसऱ्यादिवशी सर्फराज खानने (134) दमदार शतक झळकावलं. त्याच्या सेंच्युरीच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात 374 धावा केल्या. या शतकी खेळ दरम्यान सर्फराज एका मोठ्या दुर्घटनेतून बालाबाल बचावला. दुसऱ्यादिवशी खेळपट्टीवर असताना सर्फराज (Sarfaraz Khan) आपल्या शतकापासून दूर होता. त्या दिशेने त्याची खेळी सुरु होती. याच दरम्यान मैदानावर एक अपघात झाला. ज्यात सर्फराजला दुखापत झाली. पण गंभीर दुखापत होण्यापासून तो थोडक्यात बचावला. सर्फराजने फटका खेळला, तो धाव घेत असताना प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज गौरव यादवला जोरात धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, सर्फराज मैदानावरच कोसळला. काही वेळासाठी तो मैदानावरच पडून होता. BCCI TV ने या धडकेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

त्यावेळी सर्फराज किती रन्सवर होता?

सर्फराज त्यावेळी 66 धावांवर खेळत होता. व्यक्तीगत 66 धावांवर खेळताना त्याने चौकार लगावला. त्याची धावसंख्या 70 झाली. चेंडू सीमारेषा पार करत असतानाच सर्फराज रन्ससाठी धाव घेता होता. त्यावेळी हा अपघात घडला. गोलंदाज गौरव यादव सीमारेषेच्या दिशेने चाललेल्या चेंडूकडे पाहत होता. त्यावेळी सर्फराज सुद्धा त्या दिशेलाच पाहत होता. त्यामुळे ही धडक झाली. सर्फराज गौरवच्या खांद्याला जाऊन धडकला.

सर्फराजची चूक असल्याचा अर्थ काढला

सर्फराज आणि गोलंदाजामधल्या या धडकेची चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्येही झाली. यात सर्फराजची चूक असल्याचा अर्थ काढला गेला. सर्फराज त्याच्या स्वत:च्या चुकीमुळे धडकला, असं त्यांचं म्हणण होतं. मुंबईसाठी चांगली बाब म्हणजे सर्फराजला गंभीर मार लागला नाही. त्याने मुंबईसाठी फलंदाजी सुरुच ठेवली.

हे सुद्धा वाचा

इथे क्लिक करुन पहा सर्फराजन खानच्या त्या धडकेचा व्हिडिओ

सर्फराजने किती चौकार-षटकार ठोकले?

सर्फराजने आज कठीण प्रसंगात मुंबईसाठी शतक झळकावलं. त्याने 243 चेंडूत 134 धावा फटकावल्या. यात 13 चौकार आणि 2 षटकार आहेत. सर्फराजच्या या खेळीच्या बळावर मुंबईने पहिल्याडावात 374 धावा केल्या. सर्फराज शिवाय मुंबईकडून यशस्वी जैस्वालने 78 धावा केल्या.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.