Ranji Trophy Final 2022: शाब्बास सर्फराज, फायनलमध्ये सेंच्युरी, मुंबईसाठी एकटा लढतोय

Ranji Trophy Final 2022: यंदाच्या रणजी सीजनमध्ये (Ranji Trophy) मुंबई आणि मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya pradesh) हे दोन संघ फायलनमध्ये पोहोचले आहेत. बं

Ranji Trophy Final 2022:  शाब्बास सर्फराज, फायनलमध्ये सेंच्युरी, मुंबईसाठी एकटा लढतोय
Mumbai Cricketer sarfaraz khan Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 12:39 PM

मुंबई: यंदाच्या रणजी सीजनमध्ये (Ranji Trophy) मुंबई आणि मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya pradesh) हे दोन संघ फायलनमध्ये पोहोचले आहेत. बंगळुरुमध्ये दोन्ही टीम्स मध्ये अंतिम सामना सुरु आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. काल मुंबईचा कॅप्टन पृथ्वी शॉ ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यादिवस अखेर मुंबईच्या पाच बाद 248 धावा झाल्या होत्या. आज दुसऱ्यादिवशी मुंबईला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. शम्स मुलानीच्या रुपाने मुंबईला आज पहिला धक्का बसला. मुलानी कालच्या धावसंख्येवर 12 धावांवर बाद झाला. त्याला गौरव यादवने पायचीत पकडलं. त्यानंतर काल 40 धावांवर नाबाद असलेल्या सर्फराज खान (Sarfaraz Khan) आणि तनुष कोटियनने डाव पुढे नेला. त्यांनी आणखी 40 धावांची भर घातल्यानंतर कोटियनच्या रुपाने मुंबईचा सातवा गडी बाद झाला. त्याला सुद्धा गौरव यादवने 15 धावांवर क्लीन बोल्ड केलं.

सर्फराजने प्रतिकुल परिस्थितीत किल्ला लढवला

सर्फराज खानने त्या प्रतिकुल परिस्थितीतही मुंबईचा किल्ला लढवत ठेवला व शानदार शतक झळकावलं. तो 119 धावांवर नाबाद आहे. धवल कुलकर्णीला अवघ्या एक रन्सवर अग्रवालने मंत्रीकरवी झेलबाद केलं. आता तृषार देशपांडे आणि सर्फराज खानची जोडी मैदानात आहे. मुंबईच्या आठ बाद 351 धावा झाल्या आहेत.

यशस्वीचं चौथ शतकं हुकलं

मुंबईकडून काल यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 78 धावा केल्या. तो 163 चेंडूत 78 धावांची खेळी करुन आऊट झाला. यशस्वी जैस्वालने 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला. चौथ शतक झळकवण्याची त्याची संधी हुकली. याआधी क्वार्टर फायनलमध्ये उत्तराखंड विरुद्ध त्यानंतर सेमीफायनल मॅचमध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध दोन्ही डावात दोन शतकं झळकावली होती. काल यशस्वी खेळपट्टीवर टिकून राहिला पण त्याला शतकी खेळी करता आली नाही.

मुंबईची सुरुवात चांगली झाली होती

मुंबईने काल चांगली सुरुवात केली होती. सुरुवातीच्या षटकांमध्ये मध्य प्रदेशच्या गोलंदाजांना यश मिळणार नाही, याची मुंबईच्या सलामीवीरांनी काळजी घेतली. पृथ्वी आणि डावखुऱ्या यशस्वी जैस्वालने पहिल्या विकेटसाठी 87 धावांची सलामी दिली. पृथ्वीच्या रुपाने मुंबईचा पहिला विकेट गेला. अग्रवालने त्याला क्लीन बोल्ड केलं. पृथ्वीने 79 चेंडूत 47 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 1 षटकार होता. अरमान जाफर आणि सुवेद पारकर आज मोठी खेळी करु शकले नाहीत. अरमान जाफर डावखुरा फिरकी गोलंदाज कार्तिकेयच्या गोलंदाजीवर (26) धावांवर दुबेकरवी झेलबाद झाला. त्यानंतर सुवेद पारकरही विशेष चमक दाखवू शकला नाही.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.