AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Wi 1T20 : वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी-20 मॅचमध्ये हार्दिक चालवणार ‘हा’ हुमकी एक्का

या मालिकेसाठी विंडिजचे अनेक दबंग खेळाडू संघात परत आलेत. यामधील स्फोटक खेळाडूंमध्ये निकोलस पूरन, हेटमायर, शाई होपसारखे तगडे खेळाडू आहेत. मात्र भारताने हुकमी एक्क्याप्रमाणे असलेल्या खेळाडूला या मालिकेत संधी दिली आहे. 

Ind vs Wi 1T20 : वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी-20 मॅचमध्ये हार्दिक चालवणार 'हा' हुमकी एक्का
| Updated on: Aug 03, 2023 | 5:05 PM
Share

मुंबई : भारतीय संघ सध्या विंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारताने कसोटी आणि एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत उत्तम प्रदर्शन करत विंडिजचा पराभव केला आहे. आता खऱ्या अर्थाने भारतासमोर विंडिजविरोधात T20 मालिकेचं कठीण आव्हान असेल. विंडिज संघाचा सध्या डाउन फॉल सुरु असला तरी T20 मध्ये ते भारतीय संघाला चांगलीच लढत देऊ शकतात. या मालिकेसाठी विंडिजचे अनेक दबंग खेळाडू संघात परत आलेत. यामधील स्फोटक खेळाडूंमध्ये निकोलस पूरन, हेटमायर, शाई होपसारखे तगडे खेळाडू आहेत. मात्र भारताने हुकमी एक्क्याप्रमाणे असलेल्या खेळाडूला या मालिकेत संधी दिली आहे.

कोण आहे तो खेळाडू?

हा युवा खेळाडू असला तरी त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आशिया कपमध्ये आऊट केलं होतं.  जास्तीत जास्त संधी न मिळाल्याने हा खेळाडू चर्चेत आला नाही. मात्र ज्या-ज्या वेळी त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली तेव्हा त्याने संधीचं सोनं केलेलं आहे. आज विंडिजला रोखण्यासाठी हा खेळाडू महत्त्वाचा ठरणार आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून रवी बिश्नोई आहे.

टीम इंडियात विंडिज विरुद्धच्या टी 20 सीरिजमधून फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई याचं जवळपास  1 वर्षांनी पुनरागमन झालंय. रवीने अखेरचा टी 20 सामना 4 सप्टेंबर 2022 रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. आजच्या सामन्यामध्ये रवी बिश्नोई एक्स फॅक्टर ठरू शकतो.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया टी 20 सीरिज वेळापत्रक पहिला सामना, 3 ऑगस्ट.

दुसरा सामना, 6 ऑगस्ट.

तिसरा सामना, 8 ऑगस्ट.

चौथा सामना, 12 ऑगस्ट.

पाचवा सामना – 13 ऑगस्ट.

विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया

हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.