रवी शास्त्रींची एक चूक टीम इंडियाला पडली महागात, आजचा सामना रद्द, मालिका विजयही लांबणीवर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील आज सुरु होणारा पाचवा कसोटी सामना कोरोनाच्या सावटामुळे रद्द झाला आहे. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीच्या एका चूकीमुळे संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याचं समोर आलं आहे.

रवी शास्त्रींची एक चूक टीम इंडियाला पडली महागात, आजचा सामना रद्द, मालिका विजयही लांबणीवर
रवी शास्त्री

लंडन: कोणती चूक कधी महाग पडेल? काही सांगता येत नाही. इंग्लंडमध्येही भारतीय क्रिकेट संघाचे (Indian team) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची एक चूक भारतीय संघाला महाग पडली आहे. कोरोनाच्या शिरकावामुले पाचवी कसोटी सध्या रद्द करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाचा संघात शिरकाव हा रवी शास्त्री यांच्यापासून झाला. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसरा  विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी मागील आठवड्यात एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्याच ठिकाणी शास्त्रींना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे.

शास्त्री हे 5 सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित आढळले होते. त्याची फ्लो टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर भरत अरुण, आर श्रीधर आणि नितिन पटेल यांना विलगीकरणात ठेवलं होतं. त्यानंतर पुन्हा सर्वांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यानंतर शास्त्रींसह अरुण आणि श्रीधर हे देखील कोरोनाबाधित आढळले. दरम्यान या सर्वांना कोरोनाची लागण ही सामन्यादरम्यान झाली नसून एका खाजगी कार्यक्रमावेळी झाली आहे. शास्त्री हे त्यांच्या नव्या पुस्तकाच्या अनावरणासाठी आयोजित एका कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये असताना या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. कारण या कार्यक्रमाला बाहेरुन अनेकजण आले होते.

पाचवी कसोटी रद्द!

रवी शास्त्रींना कोरोनाची लागण झाल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे खेळाडूंचे बायो-बबलचे नियम आणखी कडक करुन ट्रेनिंग सेशनही रद्द करण्यात आलं. विशेष म्हणजे खेळाडूंना हॉटेल रुमबाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पाचवी टेस्ट खेळवण्याबाबतही शंका व्यक्त केली जात होती. अखेर आज होणारी पाचवी कसोटी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान बीसीसीआय़ आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपआपसांत चर्चा करुन ही कसोटी भविष्यात घेऊ शकतात अशीही चर्चा आहे. पुढील वर्षी भारत पुन्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे त्यावेळी हा सामना होऊ शकतो.

मालिका विजय लांबणीवर

कोरोनाच्या संकटामुळे दोन्ही बोर्डांनी आपसहमतीने आजची कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुले 14 वर्षानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याच्या अगदी जवळ गेलेल्या भारतीय संघाला अजून वाट पाहवी लागणार आहे. भारत सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर असला तरी PTI ला BCCI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा सामना भविष्यात खेळवला जाणार आहे. ज्यानंतरच नेमका निर्णय समोर येईल. हा सामना भारत जिंकल्यास किंवा अनिर्णीत सुटल्यास भारत मालिका जिंकेल आणि इंग्लंड सामना जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटणार आहे.

इतर बातम्या

India vs England 5th Test : पाचव्या कसोटी सामन्यावर कोरोनाचा घाला, दोन्ही बोर्डांच्या सहमतीने सामना रद्द!

वयाच्या 19 व्या वर्षी विश्वचषक जिंकला, 20 व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकलं, पण भारतीय संघात राहिला मागे, टी-20 संघातही नाव नाही

T 20 World Cup मध्ये धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर?, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली भिती

(Ravi shastri mistake causes team india as manchester test canceled for today)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI