World Test Championship Final 2021 | रवींद्र जाडेजा ते अक्षर पटेल फिरकीच्या जोडीला बुमराह-ईशांतचं वेगवान अस्त्र, भारताचा गोलंदाजांचा ताफा कसा?

टीम इंडियाची (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप (ICC World Test Championship final 2021) आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे.

World Test Championship Final 2021 | रवींद्र जाडेजा ते अक्षर पटेल फिरकीच्या जोडीला बुमराह-ईशांतचं वेगवान अस्त्र, भारताचा गोलंदाजांचा ताफा कसा?
टीम इंडिया (Team India)
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 8:18 PM

लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 च्या अंतिम सामन्यासाठी नुकतीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यासह टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यासाठीही निवड करण्यात आली. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18-22 जून दरम्यान साऊथँम्पटन येथे हा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत टी 20 आणि वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे टीम इंडियाला न्यूझीलंडचा पराभव करुन कसोटीतीलही वर्ल्ड कप जिंकायची नामी संधी आहे. हा वर्ल्ड कप उंचावण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू उत्सुक आहेत. या अंतिम सामन्यात फलंदाजांसह गोलंदाजांचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे. या अंतिम सामन्यासाठी निवड समितीने संधी दिलेल्या गोलंदाज आणि त्यांची कामगिरी आपण पाहणार आहोत. (Ravindra Jadeja Akshar Patel Jaspreet Bumrah and Ishant Sharma will be charge of bowling for Team India in ICC World Test Championship final 2021)

एकूण 10 गोलंदाज

बीसीसीआयने या अंतिम सामन्यासाठी एकूण 20 सदस्यीय संघाची घोषणा केली. भारतीय खेळाडूंचा आपआपसात अधिक सराव व्हावा आणि अनेक पर्याय उपलब्ध असावेत या उद्देशाने बीसीसीआयने तगडा संघ जाहीर केला. 20 पैकी 10 खेळाडू हे गोलंदाज आहेत. यात आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव या आणि अशा तोडीसतोड खेळाडूंचा समावेश आहे.

फिरकी गोलंदाज

फिरकी गोलंदाजीची जबाबदारी ही अश्विन, जाडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरच्या खांद्यावर असणार आहे. फलंदाजी ही जाडेजा आणि सुंदर यांची जमेची बाजू आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही दोन्ही खेळाडू अष्टपैलू कामगिरी करत आहेत. त्यामुळे या जोडीकडून टीम इंडियाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. जाडेजाने त्याच्या कसोटी कारकिर्दीत साऊथम्पटनमध्ये 1 सामना खेळला आहे. त्यामध्ये जाडेजाने 5 विकेट्स घेतल्या आहेत. जाडेजाची ही कामगिरी टीम इंडियासाठी आशादायक आहे.

अक्षर पटेलने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून पदार्पण केलं. त्यानेही त्या मालिकेत आपल्या फिरकीने धमाका केला. त्याने या मालिकेत अनेक विक्रमही आपल्या नावे केले. रवीचंद्रन अश्विन टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. त्याने इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये नुकतेच 400 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. सोबतच शतकही लगावलं होतं. त्यामुळे इंग्लंडला आपल्या फिरकीवर नाचवण्यासाठी सज्ज आहेत.

अनुभवी इशांत-चलाख बुमराह

इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव हे टीम इंडियाचे अनुभवी गोलंदाज आहेत. तर बुमराह यॉर्कर स्पेशालिस्ट आहे. निर्णायक क्षणी विकेट घेण्याची क्षमता यांच्यात आहे. तसेच मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या जोडीनेही आपल्या उपयुक्तता वेळोवेळी सिद्ध केली आहे. यामुळे टीम मॅनेजमेंट अनुभवाला प्राधान्य देणार की नव्या दमाच्या शिलेदारांना प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ठ करणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. तर केएल राहुल आणि वृद्धिमान साहा या दोघांना त्यांच्या प्रकृतीत सुधार झाल्यास संधी मिळेल.

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्झान नाग्वास्वाल्ला.

संबंधित बातम्या :

ICC World Test Championship Final | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत धमाका, मात्र आयपीएल 2021 मध्ये अयशस्वी, शार्दुलच्या नावे लाजिरवाणा विक्रम

(Ravindra Jadeja Akshar Patel Jaspreet Bumrah and Ishant Sharma will be charge of bowling for Team India in ICC World Test Championship final 2021)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.