AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dinesh Karthik याची निवृत्तीनंतर Rcb बॅटिंग कोच-मेंटॉर म्हणून नियुक्ती

Dinesh Karthik Batting Coach and Mentor Rcb: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप संपताच आरसीबीने दिनेश कार्तिकची बॅटिंग कोच आणि मेंटॉर म्हणून निवड केली आहे.

Dinesh Karthik याची निवृत्तीनंतर Rcb बॅटिंग कोच-मेंटॉर म्हणून नियुक्ती
dinesh karthik and rohit sharmaImage Credit source: AFP
| Updated on: Jul 01, 2024 | 4:20 PM
Share

टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. टीम इंडियाने यासह 17 वर्षांनंतर टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने या विजयासह 2007 नंतर टी 20 वर्ल्ड कप विजयाची प्रतिक्षा संपवली. टीम इंडियाच्या या विजयामुळे साऱ्या भारतात आनंदाची लाट पसरली आहे. वर्ल्ड कप जिंकून आता काही तास उलटले आहेत. मात्र त्यानंतरही वर्ल्ड कप विजयाचा आनंद ओसरलेला नाही. टीम इंडियाच्या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी टी20iमधून निवृत्ती जाहीर केली. तिघांनी निवृत्तीसाठी अशी वेळ निवडल्याने चाहत्यांना समाधान आहे. साऱ्या देशात वर्ल्ड कप विजयाचा माहोल असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर करणाऱ्या टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूला मोठी जबाबदारी मिळाली आहे. दिग्गज दिनेश कार्तिक याची आयपीएलमधील आरसीबी या टीमच्या बॅटिंग कोच आणि मेंटॉरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आरसीबीने सोशल मीडियावर दिनेश कार्तिकची बॅटिंग कोच आणि मेंटॉर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता विकेटकीपर बॅट्समन आरसीबीच्या खेळाडूला मार्गदर्शन करताना दिसणार आहे.

दिनेश कार्तिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

दिनेश कार्तिकने 26 कसोटी सामन्यांमध्ये 1 हजार 25 धावा केल्या आहेत. तसेच 94 एकदिवसीय सामन्यात 1 हजार 752 धावा ठोकल्या आहेत. तसेच कार्तिकने 60 टी20i मॅचमध्ये 142.61 च्या स्ट्राईक रेटने 686 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकने तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. मात्र कार्तिकला कसोटी व्यतिरिक्त इतर 2 फॉर्मेटमध्ये शतक ठोकता आलं नाही.

कार्तिकची आयपीएल कारकीर्द

दिनेश कार्तिकने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आरसीबीच्या एलिमिनेटरमधील पराभवानंतर निवृत्ती जाहीर केली. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये एकूण 6 संघांकडून एकूण 257 सामने खेळले. कार्तिकने या 257 सामन्यांमधील 234 डावांमध्ये 22 अर्धशतकांसह 4 हजार 842 धावा केल्या.

कार्तिक आरसीबीचा कोच आणि मार्गदर्शक

वर्ल्ड कपमध्ये समालोचक

दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत दिनेश कार्तिक समालोचकाच्या भूमिकेत दिसला. कार्तिकने अनेक सामन्यांमध्ये समालोचन केलं. आता वर्ल्ड कप संपताच कार्तिकला आरसीबीकडून ही गोड बातमी मिळाली. त्यामुळे आता कार्तिकसमोर आयपीएलच्या पुढील हंगामात आरसीबीला 17 वर्षांनंतर चॅम्पियन करण्याचं आव्हान असणार आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....