IPL 2024 : डुप्लेसीने आरसीबीच्या सलग 5व्या पराभवाचं खापर कुणावर फोडलं?

Faf Du Plessis On RCB vs SRH IPL 2024 : आरसीबीकडून 288 धावांचा पाठलाग करताना कॅप्टन फाफ डु प्लेसीस यानेही अप्रतिम खेळी केली. मात्र आरसीबीच्या नशिबातच पराभव लिहिलेला होता. आरसीबीचा हा सलग पाचवा पराभव ठरला.

IPL 2024 : डुप्लेसीने आरसीबीच्या सलग 5व्या पराभवाचं खापर कुणावर फोडलं?
Faf Du Plessis On RCB vs SRH IPL 2024,
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 2:05 AM

पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध विक्रमी 288 धावांचं आव्हान देऊनही 25 धावांच्या फरकानेच विजय मिळवता आला. आरसीबीने 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जोरदार लढत दिली. दिनेश कार्तिक या अनुभवी फलंदाजानच्या खेळीमुळे काही वेळ हैदराबादचं टेन्शनही वाढलं होतं. मात्र अखेर दिनेश कार्तिक 35 बॉलमध्ये 83 धावा करुन आऊट झाला आणि हैदराबादचा विजय निश्चित झाला. आरसीबीकडून कार्तिक व्यतिरिक्त कॅप्टन फाफ डु प्लेसिस याने 62 धावांचं योगदान दिलं. मात्र त्यानंतरही आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 262 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीला विजयी होता आलं नाही, मात्र त्यांनी अप्रतिम लढत दिली. आरसीबीचा हा सलग पाचवा पराभव ठरला. या 5 पराभवांनंतर कॅप्टन फाफ काय म्हणाला हे जाणून घेऊयात.

फाफ काय बोलला?

आमच्याकडून खूप चांगली बॅटिंग झाली. ती योग्य टी-20 विकेट होती. आम्ही आव्हानाजवळ पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र 280 धावांपासून दूर होतो, हे कठीण आहे. आम्ही काही गोष्टी करून पाहिल्या, आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करून पाहिल्या”, असं पॅटने सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेटेंशनमध्ये म्हटलं.

“बॅटिंगप्रमाणे आम्हाला मेहनत घेण्याची गरज आहे. पॉवर प्लेनंतर रन रेट कमी न होऊ देता तो कायम राखण्याची गरज आहे. चेसिंग करता मुलांनी हार मानली नाही.लढत बघून छान वाटलं. बॉलिंगच्या दृष्टीकोनातून 30-40 धावा जरा जास्तच होत्या. ही एक मानसिक लढाईही आहे. त्यामुळे मानसिकरित्या खंबीर असणं गरजेच आहे. कधी-कधी वाटतं की डोक्याचा स्फोट होईल”, असंही फाफने नमूद केलं.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार विशक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.