Video : रिंकू सिंहने विराटची बॅट तोडली! याबाबत कळताच कोहलीने सरळ तोंडावरच सांगितलं की..
कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंहने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार विराट कोहलीची बॅट तोडली. बॅट तोडल्यानंतर रिंकूने याबाबतची माहिती स्वत: विराट कोहलीला दिली. त्यांच्या या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कोलकात्याने पोस्ट केला आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेतील 36 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला आणि गोलंदाजी स्वीकारली. कोलकात्याने 20 षटकात 6 गडी गमवून 222 धावा केल्या आणि विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं. रिंकू सिंहने या सामन्यात 16 चेंडूत 24 धावांची खेळी केली. यात 2 चौकार आणि 1 षटकार मारला. तर दुसऱ्या डावात विराट कोहलीकडून अपेक्षा आहेत. असं असताना विराट कोहली आणि रिंकू सिंह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रिंकू सिंह विराट कोहलीला त्याची बॅट तुटल्याची माहिती देत आहे. त्यांच्या दोघांमधील मजेदार संभाषण ऐकून सोशल मीडियावर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. रिंकू सिंह या व्हिडीओत कोहलीकडे आणखी एका बॅटची मागणी करतो. त्यावर कोहलीने आपल्या शैलीत उत्तर दिलं.
रिंकू सिंह विराट कोहलीजवळ गेला आणि म्हणाला की, तुझी बॅट तुटली. यावर कोहलीने सांगितलं की, माझी बॅट स्पिनर्सवर तोडली तू, कुठे तुटली? या प्रश्नावर रिंकू बॅट दाखवत म्हणाला की, बॅट खालच्या बाजूला तुटली आहे. विराट कोहलीने तात्काळ उत्तर दिलं आणि म्हणाला, तर मी काय करू? रिंकूने सांगितलं की, काही नाही मी फक्त सांगत होतो. विराट कोहली म्हणाला, बरं झालं तू सांगितलं मोठं काम केलंस. त्यानंतर विराट कोहली हसला आणि म्हणाला, मला याची माहिती नकोय.
“Virat bhai ne ek bat diya thha… jo bat diya thha, woh mere se toot gaya” 😂 pic.twitter.com/qoJWWs2fik
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 21, 2024
रिंकू सिंह विराट कोहलीच्या दोन बॅट चेक करतो आणि बॉलसोबत नोकिंग करतो. विराट कोहली तसं करताना पाहून म्हणतो की, बेकार बॅट आहेत यार. रिंकू सिंह क्षणाचाही विलंब न करता म्हणतो, तू पाठवणार आहेस? कोहली प्रत्युत्तरात म्हणतो की, कोणला पाठवत आहे? रिंकू त्याचं उत्तर ऐकून लगेच म्हणतो, घे भाऊ.
विराट कोहली त्याला आठवण करून देतो की, एक सामन्यापूर्वी तू बॅट घेऊन गेला होतास. दोन सामन्यात दोन बॅट देऊ. तुमझ्यामुळे माझी नंतर जी परिस्थिती होते ना…यावर रिंकू सिंह म्हणतो की, शपथ घेऊन सांगतो, शोधून ठेवेन आणि तुला दाखवेन.
