
न्यूझीलंडने भारताविरूद्धचा चौथा टी20 सामना 50 धावांनी जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला होता. तसेच दव फॅक्टर लक्षात घेता प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. पण न्यूझीलंडलच्या फलंदाजांनी सळो की पळो करून सोडलं. पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे न्यूजीलंडला चौथ्या टी20 सामन्यात मोठी धावसंख्या करण्यात यश आलं. न्यूझीलंडने 20 षटकात 7 गडी गमवून 215 धावा केल्या आणि विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं. पण भारताने 18.4 षटकात सर्व गडी गमवून फक्त 165 धावांपर्यंत मजल मारली. भारताचा या सामन्यात 50 धावांनी पराभव झाली. भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका जिंकली आहे. पण चौथ्या सामन्यानंतर 3-1 अशी स्थिती झाली आहे. हा सामना भारताने गमावला असला तरी रिंकु सिंहने एक विक्रम नावावर केला आहे. रिंकु सिंहने फलंदाजीतही योगदान दिलं. त्याने 30 चेंडूत 39 धावांची खेळी केली. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. पण विजयाच्या वेशीवर काही नेऊ शकला नाही.
न्यूझीलंडकडून सलामीचे फलंदाज टिम सयफर्ट आणि डेवॉन कॉनव्हे यांनी आक्रमक सुरुवात केली. या जोडीने पॉवर प्लेच्या सहा षटकात 71 धावा केल्या. तसेच 50 चेंडूत 100 धावांची भागीदारी केली. आठव्या षटकापर्यत भारताला एकही विकेट मिळाला नाही. पण नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रिंकु सिंहने डेवॉन कॉनव्हेचा झेल पकडला.अर्शदीप टाकत असलेल्या 13 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर टिम सयफर्टचा झेल घेतला. त्यानंतर 14 व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्सचा झेला घेतला. त्यानंतर 18व्या षटकात झॅकरी फॉल्क्सचा झेल घेतला आणि विक्रमाची नोंद केली. त्याने या सामन्यात एकूण 4 गडी बाद केले.
एका सामन्यात चार झेल घेणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी अजिंक्य रहाणे याने केली होती. त्यान 2014 साली इंग्लंडविरुद्ध 4 झेल पकडले होते. बर्मिंघममध्ये त्याने हा कारनामा केला होता. त्यानंतर आता रिंकु सिंहने या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2012 मध्ये 3 झेल, तर सुरेश रैनाने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 20112 मध्ये 3 झेल पकडले होते.