Video : शतकी खेळीनंतर ऋषभ पंतचं अनोखं सेलीब्रेशन, उलटी उडी पाहून इंग्लंडला फुटला घाम
टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांना दिवसा तारे दाखवले. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिलनंतर शतकी खेळी करत टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणलं आहे. ऋषभ पंतने शतकी खेळी करत जबरदस्त सेलीब्रेशन केलं. त्याच्या सेलीब्रेशनचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 400 पार धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल, कर्णधार शुबमन गिलनंतर विकेटकीपर बॅट्समन शुबमन गिल याने शतक ठोकलं. ऋषभ पंतने कसोटी कारकिर्दीतील सातवं शतकं ठोकलं. तसेच इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमधलं हे त्याचं तिसरं शतक आहे. ऋषभ पंतने 146 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार मारत शतक पूर्ण केलं. खरं तर 99 धावांवर असताना त्याने उत्तुंग षटकार मारला आणि शतक साजरं केलं. पंतने तिसऱ्यांदा षटकार मारून तिसरं कसोटी शतक पूर्ण केलं हे विशेष. भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतके करणारा यष्टीरक्षक ठरला आहे. त्याने सहा शतके ठोकणाऱ्या एमएस धोनीचा विक्रम मोडला. ऋषभ इतक्यावरच थांबला नाही तर त्याने अनोख्या पद्धतीने सेलीब्रेशनही केलं. त्याच्या सेलीब्रेशनचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतचा आक्रमक अंदाज पाहून इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फुटला आहे. ऋषभ पंतने आणखी काही काळ मैदानात तग धरला तर आरामात 500 पार धावा होऊ शकतात.
शतक ठोकल्यानंतर ऋषभ पंतने पहिल्यांदा बॅट करून शतक साजरं केलं. त्याच्या शतकी खेळीनंतर भारतीय खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्ये टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं. मग ऋषभ पंतचं खरं सेलीब्रेशन सुरु झालं. बॅट जमिनीवर ठेवली. हँडग्लोव्ह्ज काढले आणि धावत जात उलटी उडी मारली. ऋषभ पंतने असंच सेलीब्रेशन आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात केलं होतं. आरसीबीविरुद्धच्या शेवटच्या साखळी फेरीत ऋषभ पंतने 61 चेंडूत नाबाद 118 धावा केल्या. या खेळीनंतर त्याने अशीच हवेत उडी घेत सेलीब्रेशन केलं होतं. शतकी खेळीनंतर अशा पद्धतीने सेलीब्रेशन करण्याची एक अनोखी शैली त्याने समोर आणली आहे. त्याच्या या सेलिब्रेशनचं आता कौतुक होत आहे.
Rishab Pant completes his 7th Test hundred with One handed Six 🔥🔥#INDvsENG #RishabhPant pic.twitter.com/XnEaZDNz7H
— Emperor⚡ (@ImRealEmperor) June 21, 2025
ऋषभ पंतने अशा पद्धतीने सेलीब्रेशन करताना काळजी घेणं गरजेचं आहे. कारण अपघातातून सावरल्यानंतर त्याचं कमबॅक झालं आहे. अशा स्थितीत पु्न्हा ईजा झाली तर क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागू शकतं, अशी भीतीही क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.
