AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma: रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास, वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीजमध्ये खेळणार

विराट कोहलीला वनडेच्या कॅप्टनशिपवरुन हटवल्यानंतर त्याच्याजागी रोहितची वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Rohit Sharma: रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास, वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीजमध्ये खेळणार
| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 4:50 PM
Share

नवी दिल्ली: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (INDvsWI) आगामी सीरीजमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) पुनरागमन करणार आहे. रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पास झाला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत वनडे आणि टी-20 सीरीज खेळणार आहे. रोहित शर्मा बुधवारी एनसीएसमध्ये (NCA) निवड समिती सदस्यांची भेट घेणार आहे. रोहित शर्माला बंधनकारक असणारी फिटनेस टेस्ट NCA मध्ये द्यावी लागली. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती.

हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित दक्षिण आफ्रिकेतील कसोटी आणि वनडे मालिकेला मुकला होता. विराट कोहलीला वनडेच्या कॅप्टनशिपवरुन हटवल्यानंतर त्याच्याजागी रोहितची वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

वेस्ट इंडिज विरुद्ध सहा फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मर्यादीत षटकांच्या या मालिकेसाठी हार्दिक पांड्याची संघात निवड करणार? ते लवकरच स्पष्ट होईल. सध्या हार्दिक नेटमध्ये सराव करतोय. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत वेंकटेश अय्यरचा ऑलराऊंडर म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. पण तो छाप पाडू शकला नाही. त्याच्याऐवजी शार्दुल ठाकूर आणि दीपक चहरने अष्टपैलू म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध केली.

“टी-20 वर्ल्डकपनंतर हार्दिक पांड्या संघातून बाहेर गेला. हार्दिकला संघातून डच्चू देण्यात आला. टी-20 वर्ल्डकपमधील खराब कामगिरीमुळे हार्दिकला सिलेक्टर्सना मेसेज द्यायचा होता” बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला ही माहिती दिली.

रवींद्र जाडेजाही मुकणार रवींद्र जाडेजा अजूनही दुखापतीमधून सावरण्याचा प्रयत्न करतोय. तो पूर्णपणे फिट नाहीय. श्रीलंकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेद्वारे तो संघात पुनरागमन करु शकतो. ही सीरीज फेब्रुवारीच्या शेवटास होणार आहे. या मालिकेतही जाडेजा दिसला नाही, तर तो थेट आयपीएल 2022 मध्ये खेळताना दिसेल. आयपीएलमध्ये जाडेजा चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो. धोनीच्या नंतर CSK च्या कॅप्टनशिपसाठी त्याचेच नाव आघाडीवर आहे. दी न्यू इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.