‘डोकं कुठे आहे तुझं…’ हार्षित राणाच्या त्या कृतीमुळे रोहित शर्मा वैतागला
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 305 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात हार्षित राणाने चांगली गोलंदाजी टाकली. पण एका चुकीचा फटका इंग्लंडला झाला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने हार्षित राणाला मैदानात सर्वांसमोर ओरडलं.

दुसर्या वनडे सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 305 धावांचं आव्हान ठेवलं. खरं तर हे आव्हान गाठणं वाटतं तितकं सोपं नाही. इंग्लंड फलंदाजी करत असताना वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव टाकण्यचा प्रयत्न केला. आक्रमकपणा दाखवत फलंदाजांवर संभ्रमित करण्याचा प्रयत्न सुरु होती. पण प्रत्येक वेळी असा अंदाज योग्यच ठरतो असं नाही. आक्रमकपणामुळे अनेकदा लय गमवण्याची वेळ येते. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हार्षित राणा याच्यासोबत असंच काहीसं झालं. हार्षित राणा आक्रमपणात गोलंदाजीची लय गमवून बसला. यामुळे कर्णधार रोहित शर्मा चांगलाच वैतागला. रोहित शर्माने मैदानातच हार्षित राणाची शाळा घेतली. असं काही घडलं की रोहित शर्मा म्हणाला की, डोकं कुठे होतं. हार्षित राणाचं चांगलं षटक एका चुकीमुळे बिघडलं आणि त्याला रोहित शर्माकडून ओरडा खावा लागला. इंग्लंडच्या डावातील 32व्या षटकात असं घडलं.
हार्षित राणाने या सामन्यातील वैयक्तिक सातवं षटक टाकत होता आणि गोलंदाजीही व्यवस्थित होत होती. त्याने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला बऱ्यापैकी गुंतवून ठेवलं होतं. पहिल्या चार चेंडूवर एकही धाव दिली नाही. पाचवा चेंडूही चांगला टाकला. हार्षित राणाने हा चेंडू व्यवस्थितरित्या अडवला. जवळपास पाचवा चेंडूही निर्धाव गेला होता. पण एक चुकी हार्षित राणाला महागात पडली. बटलर क्रिझच्या बाहेर उभा होता. हार्षित राणा यावेळी आक्रमकपणा दाखवण्यासाठी गेला आणि जोरात स्टंपवर बॉल फेकला. यावेळी जोस बटलर क्रिझमध्येच होता. पण हार्षित असा बॉल मारला की स्टंपचा लांब लांबपर्यंत संबंध राहिला नाही आणि चौकार गेला.
हार्षित राणाच्या या चुकीचा फटका टीम इंडिया आणि त्याला स्वत:ला बसला. हार्षित राणाचं हे षटक निर्धाव गेलं असतं. पण चार धावा स्वत:च्या चुकीमुळेच गेल्या. कर्णधार रोहित शर्माने त्याला फटकारलं. पण चूक असल्याने ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. रोहित शर्मा म्हणाला की, ‘डोकं कुठे आहे तुझं..का फेकत आहेस.’ हार्षितकडे याचं उत्तर नव्हतं. त्यांच्या या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.