भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूचा अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत चित्रपट येतोय? 4 सप्टेंबरला ट्रेलर होणार रिलीज

तो कॅप्टन म्हणून 37 टी 20 सामने खेळला. यात 31 सामन्यात विजय मिळवला. आशिया कप स्पर्धा सुरु असताना रोहितने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलय.

भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूचा अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत चित्रपट येतोय? 4 सप्टेंबरला ट्रेलर होणार रिलीज
Rashmika-Team india
Image Credit source: instagram
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 02, 2022 | 10:39 AM

मुंबई: भारतीय संघ (Team India) सध्या आशिया कप 2022 (Asia cup) मध्ये खेळतोय. या टूर्नामेंट मध्ये टीमने आतापर्यंत शानदार प्रदर्शन केलं आहे. भारताने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. भारताने आधी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान त्यानंतर हाँगकाँगच्या टीमवर विजय मिळवला. या दरम्यान कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) सुद्धा काही महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. तो कॅप्टन म्हणून 37 टी 20 सामने खेळला. यात 31 सामन्यात विजय मिळवला. आशिया कप स्पर्धा सुरु असताना रोहितने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलय.

मी थोडा घाबरतोय, हे एकप्रकारच्या डेब्यु सारखं आहे’

सुपर 4 मध्ये भारताचा सामना पाकिस्तान किंवा हाँगकाँगशी होऊ शकतो. या दरम्यान रोहितने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलाय. रोहितने पोस्ट केलेला फोटो चित्रपटाच्या पोस्टरसारखा आहे. रोहित या फोटोत एकटा दिसतोय. ‘Mega Blockbiuster’ असं या फोटोवर लिहिलं असून 4 सप्टेंबरला ट्रेलर रिलीज होणार असल्याची माहिती आहे. ‘मी थोडा घाबरतोय, हे एकप्रकारच्या डेब्यु सारखं आहे’ असं रोहितने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

गांगुलीनेही फोटो पोस्ट केला

फक्त रोहितच नाही, भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सुद्धा असाच फोटो पोस्ट केलाय. सौरव गांगुली यांनी सुद्धा चित्रपटाच्या पोस्टरसारखा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. स्वत: गांगुली या फोटो मध्ये आहेत. “यासाठी शूटिंग करायला मजा आली, नवीन ब्लॉगबस्टर लवकरच रिलीज होणार आहे” असं पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SOURAV GANGULY (@souravganguly)


फक्त रोहित, गांगुलीच नाही तर दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाने सुद्धा असाच पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय.

काय सिक्रेट आहे?

पोस्ट केलेला फोटो नेमका कशाविषयीचा आहे. ते काय रिलीज होण्याची वाट पाहतायत, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या फक्त वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. हा कुठलातरी चित्रपट असू शकतो, असा कयास आहे. रश्मिका मंदाना आणि रोहित शर्मा एकत्र पडद्यावर दिसणार का? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें