AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीतील टीम इंडियाचे 3 खेळाडू टीममधून बाहेर! कारण काय?

Rohit Sharma Shreyas Iyer : रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल या तिघांची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली आहे. त्याआधी तिघेही इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. मात्र त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे.

Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीतील टीम इंडियाचे 3 खेळाडू टीममधून बाहेर! कारण काय?
rohit sharma team indiaImage Credit source: Bcci
| Updated on: Jan 28, 2025 | 7:30 AM
Share

टीम इंडिया सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. टी 20i मालिकेत टीम इंडियाचे युवा शिलेदार खेळत आहेत. तर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडविरुद्ध होणारी एकदिवसीय मालिका टीम इंडियासाठी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे अनुभवी खेळाडूंसह काही युवा क्रिकेटपटूंना या टी 20i मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाचे काही खेळाडू हे बीसीसीआयच्या आवाहनानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळत आहेत. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल यांचा आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे.

रोहित, श्रेयस आणि यशस्वी हे तिघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. हे तिघेही काही दिवसांपूर्वी रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरविरूद्धच्या सामन्यात खेळले होते. मुंबईला जम्मू-काश्मीरकडून पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता मुंबईचा पुढील सामना हा 30 जानेवारीपासून होणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात मेघालयचं आव्हान असणार आहे. त्या सामन्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे.

मुंबई विरुद्ध मेघालय हा सामना बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकादमीत खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यासाठी रोहित, श्रेयस आणि यशस्वी उपलब्ध नसतील, अशी माहिती समोर आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी नागपूरमध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी या तिघांना हजर रहावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हे तिघेही मेघालयविरुद्ध खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. तसेच इंडिया-इंग्लंड यांच्यात 6 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे.

शिवम दुबेही आऊट!

मेघालयविरुद्ध ऑलराउंडर शिवम दुबेही खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवमची इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

आयुषचं कमबॅक फिक्स!

दरम्यान रोहित आणि इतर खेळाडू मेघालयविरुद्ध खेळणार नसल्यानं इतरांना संधी मिळणार, असं म्हणता येईल. रोहितमुळे जम्मू-काश्मीरविरुद्ध आयुष म्हात्रे याला बाहेर बसावं लागलं होतं. मात्र आता त्याची पुन्हा एकदा प्लेइंग ईलेव्हनमध्ये एन्ट्री होऊ शकते.

मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर,सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर),आकाश आनंद (विकेटकीपर), तनुष कोटीयन, शम्स मुलानी, हिमांशु सिंग, शार्दूल ठाकुर, मोहित अवस्थी, सिलवेस्टर डीसोझा, रॉयस्टर डायस आणि कर्श कोठारी.

निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.