AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohir Sharma: टीम इंडिया जिंकूनही रोहित शर्मा का भडकला? त्याला काय नाही पटलं?

शेवटी रडतखडत 12 धावांनी विजय मिळवला. हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूरने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये गडबड केली असती, तर भारताच्या खात्यावर मानहानीकारक पराभवाची नोंद झाली असती.

Rohir Sharma: टीम इंडिया जिंकूनही रोहित शर्मा का भडकला? त्याला काय नाही पटलं?
| Updated on: Jan 19, 2023 | 12:37 PM
Share

Rohit Sharma Statement: टीम इंडियाने काल न्यूझीलंड विरुद्ध पहिला वनडे सामना जिंकला. टीम इंडियाने मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. पण टीम इंडियाच्या या विजयावर कॅप्टन रोहित शर्मा फार समाधानी नाहीय. टीम इंडियाने 350 धावांचा डोंगर उभारला. पण शेवटी रडतखडत 12 धावांनी विजय मिळवला. हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूरने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये गडबड केली असती, तर भारताच्या खात्यावर मानहानीकारक पराभवाची नोंद झाली असती. त्यामुळे रोहित शर्माच नाराज होणं स्वाभाविक आहे. विजयानंतर बोलतान रोहित शर्माला भडकला होता. त्याला काही गोष्टी पटल्या नाहीत, हे त्याच्या बोलण्य़ातून स्पष्टपणे जाणवत होतं. रात्रीच्यावेळी बॉलिंग करणं बिलकुलही सोप नव्हतं, असं रोहित म्हणाला.

रोहितने प्रामाणिकपणे सांगितलं

सामना संपल्यानंतर रोहित शर्माने मोठं विधान केलं. “प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास, मायकल ब्रेसवेल ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता. आणि चेंडू ज्या प्रमाणे बॅटवर येत होता, ते मायकल ब्रेसवेलसाठी क्लीन बॉल स्ट्रायकिंग होतं. आम्ही चांगली गोलंदाजी करु, तो पर्यंत सगळं ठिक असेल. मी टॉसच्यावेळी म्हटलं होतं की, मला स्वत:ला चॅलेंज द्यायच आहे. मला अपेक्षित स्थिती नव्हती. पण काहीवेळा असं होतं” असं रोहित शर्मा म्हणाला.

रोहितकडून दोघांच तोंडभरुन कौतुक

“शुभमन गिल चांगला खेळतोय. तो ज्या फॉर्ममध्ये आहे, त्याचा आम्हाला फायदा उचलायचा आहे. म्हणूनच श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजमध्ये आम्ही त्याला पाठिंबा दिला. सिराज टेस्ट, टी 20 आणि वनडे फॉर्मेटमध्येही शानदार गोलंदाजी करतोय. तो ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, ते खरच कौतुकास्पद आहे. त्याला जे करायचय, त्यावर तो अमल करतोय. तो त्याच्या योजनांबद्दल पूर्णपणे स्पष्ट आहे” असं रोहित शर्मा म्हणाला.

शुभमन गिल काय म्हणाला?

मैदानावर उतरुन, मला जे करायचय त्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. विकेट पडल्यानंतर मला मोकळेपणाने खेळायच होतं. मी शेवटपर्यंत असा खेळू शकलो, याचा आनंद आहे. बॉलर टॉपवर असताना, तुम्ही त्याच्यावर दबाव टाकला पाहिजे” असं शुभमन गिल म्हणाला. “मी 200 रन्सचा विचार करत नव्हतो. पण 47 व्या ओव्हरमध्ये दोन सिक्स मारल्यानंतर मी हे करु शकतो, असं मला वाटलं. त्याआधी मी चेंडूला नीट वॉच करुन खेळत होतो” असं शुभमन म्हणाला. शुभमन गिलने 19 इनिंगमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. पाकिस्तानच्या इमाम-उल-हक सोबत संयुक्तपणे वेगवान हजार धावा करण्यामध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानी बॅट्समन फखर जमनने 18 इनिंगमध्ये 1000 धावा केल्या होत्या.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.