Rcb : बंगळुरुतील चेंगराचेंगरीनंतर आरसीबीची पहिली प्रतिक्रिया, चाहत्यांना आवाहन, नक्की काय?
Royal Challengers Bengaluru Releases A Statement on Bengaluru Stampede : रॉयल चॅलेंजर्सने 18 वर्षानंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली. मात्र त्यानतंर अवघ्या काही तासांनंतर झालेल्या दुर्घटनेमुळे या विजयाला गाळबोट लागलं. त्यानंतर आरसीबी टीम मॅनेजमेंटकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 18 व्या मोसमात पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. आरसीबीने यासह 18 वर्षांची प्रतिक्षा संपवली. विराट कोहली याचं आणि असंख्य चाहचत्यांचं स्वप्न पूर्ण झालं. मात्र काही तासांनीच आरसीबीच्या आनंदावर विरजण पडलं. आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाच्या 18 तासांनंतरच एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मात्र स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आनंदावर विरडण पडलं. या दुर्घटनेनंतर आता आरसीबीकडून अधिकृत निवदेन जारी करण्यात आलं आहे. आरसीबीने या निवेदनाद्वारे दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलंय. तसेच चाहचत्यांना आवाहन केलंय. या निवदेनात काय म्हटलं? जाणून घेऊयात.
आरसीबीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन निवदेनद्वारे आपली बाजू मांडली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी रात्री 10 वाजून 11 मिनिटांनी हे निवेदन जारी केलं. आरसीबीकडून घडलेल्या या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांसाठी मनापासून संवेदना व्यक्त केल्या.
आरसीबीचं बंगळुरुतील चेंगराचेंगरीनंतर निवेदन
𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗺𝗲𝗻𝘁: 𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗲𝗻𝗴𝗮𝗹𝘂𝗿𝘂
We are deeply anguished by the unfortunate incidents that have come to light through media reports regarding public gatherings all over Bengaluru in anticipation of the team’s arrival this… pic.twitter.com/C0RsCUzKtQ
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 4, 2025
“आज दुपारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या आगमनावेळी बंगळुरु शहरातील सार्वजनिक ठिकाणी काही घटना घडल्याची बातमी माध्यमांतून समोर आल्याने आम्हाला खूप दुःख झालंय. प्रत्येकाची सुरक्षितता आणि कल्याण आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आरसीबीला खूप खेद आहे. आम्ही मृत कुटुंबांच्या दु:खा मनापासून सहभागी आहोत आणि त्याप्रती संवेदना व्यक्त करतो”, असं म्हणत आरसीबीने मृतांच्या कुटुंबियांसाठी सहवेदना व्यक्त केल्या.
” चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच आम्ही ताबडतोब नियोजित कार्यक्रमात बदल केला. तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचना आणि सल्ल्याचं पूर्णपणे पालन केलं”, असं म्हणत आम्ही कशाप्रकारे प्रशासनाला सहकार्य केलं, हे दाखवून देण्याचा प्रयत्न आरसीबीने या निवेदनातून केला आहे. तसेच चाहत्यांना शेवटच्या वाक्यात संदेश देत आवाहनही करण्यात आलं आहे.
चाहत्यांसाठी आवाहन
कोणत्याही टीमसाठी त्यांचे चाहते हे त्यांचा प्राण असतो. आरसीबीच्या चाहत्यांनी 17 वर्ष सत्ताधारी पक्षाप्रमाणे टीका सहन केली. मात्र आरसीबीची साथ सोडली नाही. चाहते आरसीबीसोबत एकनिष्ठ राहिले. आरसीबीने या चाहत्यांसाठी दुर्घटनेनंतर स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. “तसेच कृपया सुरक्षित रहा” असं 4 शब्दात आरसीबीने चाहत्यांना केलं आहे.
ते प्रश्न अनुत्तरीत
दरम्यान मृतांच्या कुटुंबियांसाठी सहवेदना व्यक्त केल्या. मात्र मृत्यू झालेल्या त्या 11 जणांच्या कुटुंबाचं काय? त्या 11 जणांची काय चूक होती? आरसीबीचे चाहते असणं हे त्यांना भोवलं का? आरसीबी त्यांच्या चाहत्यांना मदत करणार का? या मृत्यूला जबाबदार कोण? हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
