AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs DC Live Streaming : दिल्लीसमोर गतविजेत्या आरसीबीचं आव्हान, पराभवाची हॅट्रिक टाळणार?

Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals IPL 2026 Live Scorecard : गतविजेता म्हणून आरसीबीने 19 व्या मोसमातही आपला दबदबा कायम ठेवला आहे. आरसीबीने या हंगामात आतापर्यंत फक्त 1 सामना गमावला आहे. तर दिल्ली सातत्य ठेवण्यात अपयशी ठरली आहे.

RCB vs DC Live Streaming : दिल्लीसमोर गतविजेत्या आरसीबीचं आव्हान, पराभवाची हॅट्रिक टाळणार?
RCB vs DC Live StreamingImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 18, 2026 | 2:36 AM
Share

क्रिकेट चाहत्यांना आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) शनिवारी 17 एप्रिलला डबल हेडरचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स भिडणार आहेत. दिल्लीचा हा या हंगामातील पाचवा तर आरसीबीचा सहावा सामना असणार आहे. रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. अक्षर पटेल याच्या खांद्यावर दिल्ली कॅपिट्ल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दिल्लीसमोर या सामन्यात पराभवाची हॅट्रिक टाळण्यासह गतविजेच्या आरसीबीला रोखण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे.  त्यामुळे दिल्ली आरसीबीला रोखण्यात यशस्वी ठरणार की गतविजेता विजयी घोडदौड कायम राखणार? याचे चाहत्यांना वेध लागले आहेत. यानिमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना कधी?

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना शनिवारी 18 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना कुठे?

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होणार आहे.

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

दोन्ही संघांची 19 व्या मोसमातील आतापर्यंतची कामगिरी

आरसीबीने आतापर्यंत 5 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आरसीबी 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने चेन्नई आणि हैदराबादला पराभूत केलं. त्यानंतर राजस्थानने आरसीबीला विजयी हॅट्रिकपासून रोखलं. त्यानंतर आरसीबीने मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवलाय.

तसेच दिल्लीने 4 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर दिल्लीला तितक्याच सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. दिल्ली 4 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. दिल्लीने लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सला पराभूत करत मोहिमेतील सलग 2 सामने जिंकले. मात्र त्यानंतर दिल्लीला गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सकडून पराभूत व्हाव लागलं.

दिल्ली-आरसीबी हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान दिल्ली-आरसीबी आतापर्यंत एकूण 33 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी आरसीबीने सर्वाधिक 19 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 12 वेळा आरसीबीला पराभवाची धुळ चारली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...