AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीसमोर मोहम्मद शमीचे चॅलेंज; महा सामन्यात कोण कुणावर भारी?

Vaibhav Suryavanshi vs Mohammad Shami: आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ विजयासाठी झुंजतील. त्यात वैभव सूर्यवंशीसमोर मोहम्मद शमींचे चॅलेंज असेल. महा सामन्यात कोण कुणावर भारी ठरणार हे लवकरच समोर येईल.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीसमोर मोहम्मद शमीचे चॅलेंज; महा सामन्यात कोण कुणावर भारी?
वैभव सूर्यवंशी, मोहम्मद शमी Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 23, 2026 | 3:28 PM
Share

Vaibhav Suryavanshi vs Mohammad Shami RR vs LSG IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) या दोन संघात 32 वा महा मुकाबला होणार आहे. इकाना स्टेडियमवर विजयासाठी दोन्ही संघ रणशिंग फुंकतील. या सामन्यात तुफान खेळी करणारा वैभव सूर्यवंशी आणि फिरकीचा बादशाह सुलतान मोहम्मद शमी यांचा सामना होणार आहे. गेल्या 6 सामन्यात वैभवने 20 षटकार आणि 24 चौकार ठोकले आहेत. पण आरआरची एक लगंडी बाजू समोर आली आहे. हा संघ यशस्वी जायसवाल आणि वैभव सूर्यवंशी या सलामी जोडीवरच निर्भर असल्याचे दिसते. हे दोघांना करिष्माई कामगिरी करता आली नाही तर हा संघ चौथ्या क्रमांकावर घसरू शकतो. वैभवला येत्या सामन्यात शतक अथवा अर्धशतक करणे गरजेचे असल्याचे चाहत्यांना वाटते.

मोहम्मद शमीचं मोठं आव्हान

वैभवसाठी हा सामना मोठे आव्हान असेल. जसप्रीत बुमराह याला त्याने दोन जबरदस्त षटकार ठोकले. पण मोहम्मद शमी हा फिरकीचा बादशाह मानल्या जातो. हाताचा योग्य उपयोग केला नाही तर चांगले फलंदाजही त्याच्यासमोर हतप्रभ होतात. त्यामुळे शमीविरोधात खेळताना वैभवला खास प्लॅनिंगने खेळणे आवश्यक मानले जात आहे. शमीचा चेंडू हा उसळून फलंदाजाला भ्रमित करतो, त्यामुळे वैभवला शमीचा सामना करण्यासाठी राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक खास मंत्र देतील. पण त्यानेही सबुरीने घेणे गरजेचे असल्याचे चाहत्यांना वाटते. इकाना स्टेडियम हे गोलंदाजांसाठी खास मैदान मानले जाते. वेगवान गोलंदाजाला येथील धावपट्टी साथ देते. त्यामुळे या ठिकाणी वैभव, अनुभवी शमीला या मैदानावर षटकार ठोकतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

IPL 2026 मध्ये वैभवची मोठी कमाल

वैभव सूर्यवंशी हा निडरपणे गोलंदाजांचा सामना करतो. जोपर्यंत आपण धावपट्टीवर आहोत, तोपर्यंत सामना ओढून आणण्याची ,खेचून आणण्याची आपल्यात क्षमता आहे, असा विश्वास वैभवने दाखवला आहे. IPL 2026 च्या आकडेवारीवर नजर टाकल्यावर वैभवची दमदार कामगिरी समोर येते. त्याने आयपीएलमध्ये 6 सामने खेळले आहेत. त्यात 41 धावांच्या सरासरीसह त्याने 246 धावा केल्या आहेत. सर्वात आश्चर्य म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट हा 236.54 असा जबरदस्त आहे. या अवघ्या सहा सामन्यात त्याने 24 चौकार आणि 20 षटकार ठोकले आहेत. त्याची आक्रमकता हीच त्याची ओळख आहे. मैदानावर आल्यावर धावांचा पाऊस पाडणे हेच त्याला माहिती आहे. पण त्याला या सामन्यात अजून शतक ठोकता आलेले नाही. आयपीएलमध्ये शतक ठोकण्याचे त्याचे स्वप्न आगामी सामन्यात तो पूर्ण करणार का, याकडेही क्रिकेट जगताचं लक्ष आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल