Rajasthan Royals vs Delhi Capitals, Sanju Samson | संजू सॅमसनचा हवेत झेपावत एकहाती शानदार कॅच, शिखर धवन आऊट, पाहा व्हिडीओ

Rajasthan Royals vs Delhi Capitals, Sanju Samson | संजू सॅमसनचा हवेत झेपावत एकहाती शानदार कॅच, शिखर धवन आऊट, पाहा व्हिडीओ
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 7 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात खेळला जात आहे. विकेटकीपर कर्णधार संजू सॅमसनने (sanju samson) हवेत झेपावत शिखर धवनचा (take shikhar dhawan one handed super catch) एकहाती शानदार कॅच घेतला.

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 7 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात खेळला जात आहे. विकेटकीपर कर्णधार संजू सॅमसनने (sanju samson) हवेत झेपावत शिखर धवनचा (take shikhar dhawan one handed super catch) एकहाती शानदार कॅच घेतला.

sanjay patil

|

Apr 15, 2021 | 8:45 PM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 7 वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येत आहे. राजस्थानने टॉस जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी भाग पाडले आहे. राजस्थानने शानदार सुरुवात केली आहे. राजस्थानने दिल्लीला सुरुवातीपासून मोठे धक्के दिले. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट शानदार गोलंदाजी करत आहे. दिल्लीला शिखर धवनच्या रुपात दुसरा धक्का बसला. विकेटकीपर कर्णधार संजू सॅमसनने हवेत झेपावत शिखर धवनचा शानदार एकहाती कॅच घेतला. (rr vs dc ipl 2021 rajasthan royals wicket keepar captain sanju samson take shikhar dhawan one handed super catch)

असा घेतला कॅच

जयदेव उनाडकट सामन्यातील चौथी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर धवनने स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात चेंडूचा बॅटला वरच्या भागाला स्पर्श झाला. हा चेंडू कट लागून विकेटकीपर संजूच्या दिशेने गेला. संजूने हवेत झेपावत एकहाती शानदार कॅच घेतला. शिखर धवनने 11 चेंडूत 1 चौकारासह 9 धावा केल्या.

दिल्लीच्या पावरप्लेमध्ये 36 धावा

दिल्लीने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 36 धावा केल्या आहेत. राजस्थानचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने पावर प्लेमध्ये 3 विकेट्स घेतल्या. त्याने पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणेला आऊट केलं.

दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोटात 2 खेळाडूंची एन्ट्री

राजस्थान विरुद्धच्या सामन्याआधी दिल्लीच्या गोटात 2 खेळाडूंची एन्ट्री झाली. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या जागी मुंबईचा फिरकी गोलंदाज शम्स मुलानीला संधी देण्यात आली. तर दुखापतीमुळे 14 व्या मोसमाला मुकाव्या लागलेल्या श्रेयस अय्यरच्या जागी कर्नाटकचा फलंदाज अनिल जोशीला संधी मिळाली.

दोन्ही संघात प्रत्येकी 2 बदल

राजस्थान आणि दिल्लीमध्ये 2 बदल करण्यात आले. राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला दुखापतीमुळे या मोसमातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे स्टोक्सच्या जागी डेव्हिड मिलरला संधी मिळाली. तर फिरकीपटू श्रेयस गोपाळच्या जागी जयदेव उनाडकटचा समावेश करण्यात आला.

तर दिल्लीच्या गोटात वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाचे आगमन झालं आहे. तर अमित मिश्राच्या जागी ललित यादवला संधी मिळाली आहे. यानिमित्ताने ललितचे आयपीएल पदार्पण ठरलं आहे. ललित रणजी करंडकात दिल्लीचे प्रतिनिधित्व करतो.

दिल्ली कॅपिटल्सचे अंतिम 11 खेळाडू

रिषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अंजिक्य रहाणे, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, टॉम करन, ख्रिस वोक्स, खगिसो रबाडा, रवीचंद्रन अश्विन आणि आवेश खान

राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन

संजू सॅमसन (कर्णधार), जॉस बटलर, मनन वोहरा, डेव्हीड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, मुस्तफ़िजुर रहमान आणि चेतन साकरिया.

संबंधित बातम्या :

Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Score, IPL 2021 | दिल्लीला चौथा झटका, मार्कस स्टोयनिस आऊट

(rr vs dc ipl 2021 rajasthan royals wicket keepar captain sanju samson take shikhar dhawan one handed super catch)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें