AUS vs SA WTC Final Live Streaming : भारतात सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या
South Africa vs Australia Final Live And Digital Streaming : टी 20 वर्ल्ड कप, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएल 2025 नंतर आता टेस्ट वर्ल्ड कप फायनलचा थरार रंगणार आहे. या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप 2025 महामुकाबल्यात जोरदार चुरस असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची ऑस्ट्रेलियाची ही सलग दुसरी वेळ आहे. तर दक्षिण आफ्रिकेने यंदा पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक दिली आहे. या स्पर्धेला 2019 साली सुरुवात झाली. या साखळीतील पहिल्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने टीम इंडियावर मात केली होती. तर 2021-2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे यंदा ऑस्ट्रेलियाकडे सलग दुसऱ्यांदा टेस्ट वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. आता अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा मैदान मारणार की पहिल्याच झटक्यात दक्षिण आफ्रिका इतिहास घडवणार? याची उत्सुकता चाहत्यांना लागू आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मॅच केव्हा?
साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मॅच 11 ते 15 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर 16 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल कुठे?
साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचं लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन येथे आयोजन करण्यात आलं आहे.
साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरुवात होणार?
साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.
साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मॅच टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मॅच मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मॅचचा थरार मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
या महाअंतिम सामन्यात टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. पॅटला टेम्बाच्या तुलनेत कर्णधार म्हणून फायनलमध्ये खेळण्याचा जास्त अनुभव आहे. तर दक्षिण आफ्रिकेची पहिली वेळ आहे. आता अशात अनुभवी पॅट यशस्वी होणार की टेम्बाचा संघ इतिहास घडवणार? यासाठी 5 दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
