
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा कोलकातामधील इडन्स गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन टेम्बा बावुमा याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय गोलंदाज पाहुण्या संघाला किती धावांवर रोखतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाकडून पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 विकेटकीपर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. नियमित उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याचं कमबॅक झालं आहे. पंतला इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाली होती. तेव्हापासून पंत टीम इंडियापासून दूर होता. मात्र आता पंतने दुखापतीवर मात करत भारतीय संघात पुनरागमन केलं आहे.
पंतला नितीश कुमार रेड्डी याच्या जागी संधी देण्यात आली आहे. नितीशला पहिल्या कसोटीतून दक्षिण आफ्रिका ए विरूद्धच्या अनऑफीशियल वनडे सीरिजसाठी रिलीज करण्यात आलं आहे. तसेच विकेटकीपर ध्रुव जुरेल यालाही संधी देण्यात आली आहे. ध्रुवनेही दक्षिण आफ्रिका ए विरूद्धच्या दुसऱ्या अनऑफीशियल टेस्ट मॅचमध्ये 2 शतकं झळकावली होती. त्यानंतर ध्रुवला संधी देण्यात आली.
तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज कगिसो रबाडा याला दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकावं लागलं आहे. त्यामुळे रबाडाच्या जागी कॉर्बिन बॉश याला संधी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती कर्णधार टेम्बा बावुमा याने टॉसनंतर दिली.
कोलकातात 6 वर्षांनी कसोटी सामना
🚨 Toss 🚨#TeamIndia have been asked to bowl first in Kolkata.
Updates ▶️ https://t.co/okTBo3qxVH#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/St1ygiQWwt
— BCCI (@BCCI) November 14, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, टेम्बा बावुमा (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (विकेटकीपर), सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश आणि केशव महाराज.